परभणी जिल्हा बॅंकेच्या संचालकपदासाठी रविवारी मतदान परभणी जिल्ह्यात नऊ तर हिंगोली जिल्ह्यात पाच मतदान केंद्र

file photo
file photo

परभणी ः परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या 14 संचालक पदासाठी रविवारी (ता.21) मतदान घेतले जाणार आहे. यासाठी परभणी जिल्ह्यात नऊ तर हिंगोली जिल्ह्यात पाच केंद्रावर ही मतदानाची प्रक्रिया पूर्ण केली जाईल. बॅंकेच्या 21 सदस्यापैकी सात संचालक बिनविरोध निवडले गेले आहेत. आता 14 जागांसाठी 30 उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

परभणी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या पंचवार्षिक निवडणुकीत यंदा वरपुडकर विरुध्द बोर्डीकर गट सक्रीय झाला आहे. या दोन्ही गटातच अटी - तटीची लढाई होत आहे. गेल्या 15 दिवसापासून प्रचाराचा धुराळा उडाला आहे. या प्रचाराच्या तोफा शनिवारी (ता.20) सांयकाळी थंडावल्या. गेल्या 15 दिवसात अनेक घडामोडी घडत गेल्या त्यामुळे ही निवडणुक अधिकच चर्चेची झाली आहे.  निवडणुकीसाठी परभणी व हिंगोली जिल्ह्यातील एकूण 115 कर्मचाऱ्यांची व पाच क्षेत्रीय अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक मतदान केंद्रावर आवश्यक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

मतदान केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता नियम लागू करण्यात आला आहे. प्रत्येक मतदाराने केलेल्या मतदानाची गोपनियता कायम राहण्या करिता मतदान केंद्रात मोबाईल अथवा कोणतेही इलेक्ट्रानिक उपकर घेवून जाण्यास मनाई करण्यात आली आहे. कोरोना पार्श्वभूमीवर प्रत्येक केंद्रास सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याच प्रमाणे सामाजिक अंतर राखले जाईल याबाबत सर्व अधिकारी, कर्मचारी यांना सुचना देण्यात आल्या आहेत.

कल्याण मंडपम येथे मंगळवारी मतमोजणी

मतदान झाल्यानंतर सिलबंद मतपेट्या ठेवण्यासाठी कल्याण मंडपम (परभणी) येथे व्यवस्था करण्यात आली आहे. हा संपूर्ण परिसर सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या निगराणी खाली आहे. या ठिकाणी ही मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतमोजणी मंगळवारी, ता. 23 मार्च रोजी होणार आहे. यासाठी 8 मतमोजणी टेबलांची व्यवस्था करण्यात आली आहे. मतमोजणीसाठी 54 मतमोजणी अधिकारी, कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

मतदान व मतमोजणी दरम्यान कोणत्याही अनुचित प्रकार घडणार नाही याची सहकार विभाग व पोलिस प्रशासन यांच्या मार्फत योग्य ती दक्षता घेण्यात येत आहे. मतदारांनी भयमुक्त व खुल्या वातावरणात मतदान करावे.

- मंगेश सुरवसे, जिल्हा उपनिबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी

संपादन- प्रल्हाद कांबळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com