
मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप युतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवाजी पवार, इंजिनीअर देशमुख, संतोष टेकाळे आदींची उपस्थिती होती.
हिंगोली : महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्रात कोरोना महामारीच्या नावाखाली मोठा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप नितेश राणे यांनी शनिवारी (ता. २८) पत्रकार परिषदेत केला आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीतील भाजप युतीचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारार्थ शनिवारी भाजपा कार्यालयात झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, शिवाजी पवार, इंजिनीअर देशमुख, संतोष टेकाळे आदींची उपस्थिती होती.
पुढे बोलताना राणे म्हणाले, हे सरकार लोक उपयोगी नाही महाराष्ट्राला बदनाम करण्याचं काम हे सरकार करते. गेल्या एक वर्षांत आपण काय केले ते जनतेला जाहीरपणे सांगावे ते सोडून दुसऱ्याच कामात त्यांचे मन गुंतलेले असते. मुख्यमंत्र्यांनी स्वतः चे कुटुंब सोडून कोणाचीही जबाबदारी घेतली नाही असाही टोला त्यांनी लगावला.
हेही वाचा - नांदेड : बनावट रासायनिक खत शेतकऱ्यांच्या माथी, गुन्हा दाखल -
महाराष्ट्र पन्नास वर्षे मागे घेऊन जाण्याचं काम या आघाडी सरकारने केला आहे. राज्य चालवता येत नसेल तर राजीनामा द्या असे काम केले तर पुढील चार वर्षांत महाराष्ट्र किती अधोगतीला जाईल हे सांगता येणार नाही. खरंच मर्द असाल तर एकदाच सेक्युलर पक्ष आहे असं जाहीर करा असे ते म्हणाले.
आघाडी सरकारला वर्षपूर्ती झाली आहे. त्याबद्दल खरपूस समाचार घेताना नितेश राणे आघाडी सरकारवर टीका टिपणी करताना म्हणाले, राज्याची आर्थिक परिस्थिती २०१९ पासून ६० .८७८लाख कोटी खाली आली आहे.राज्यावर ५. २लाख कोटीचे कर्ज आहे. महसूल तूट ही ३५ कोटीपर्यंत असल्याचे सांगून राज्याचा महसूल नोव्हेंबर २३ पर्यंत दहा हजार कोटी पर्यंत कमी आहे. २०१९च्या तुलनेत यावर्षी २९ टक्के कमी आहे.शासनाने राज्याच्या अर्थव्यवस्थेच्या निधी खर्चाला ६८ टक्के कात्री लावलेली आहे. त्यामुळे कामे विकास कसा होणार असा सवाल त्यांनी उपस्थित केला. सरकारची विकासासाठी प्राथमिकता नसल्याने आघाडीचे एक वर्ष किमान ५० वर्ष माघे घेऊन जाणार आहे. त्यामुळे हे सरकार लोक उपोयोगी नसल्याचा टोला त्यांनी शेवटी लगावला.
संपादन - प्रल्हाद कांबळे