
परळी वैजनाथ : राज्याच्या पशुसंवर्धनमंत्री पंकजा मुंडे यांच्या प्रयत्नातून येथील पशुवैद्यकीय महाविद्यालयासाठी परळी व लोणी येथील ७२ एकर शासकीय गायरान जमीन महसूल व वन विभागाने पशुसंवर्धन विभागाला प्रदान केली. याबाबतचा शासन निर्णय मंगळवारी (ता. २२) निर्गमित करण्यात आला.