esakal | Video : जिल्हा रुग्णालयातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कसा? तो वाचाच
sakal

बोलून बातमी शोधा

Nanded News

जिल्हा रुग्णालयात भरतीसाठी गर्दी उसळल्याने उमेद्वारांकडील अर्ज जमा करून मुलाखती रद्द करण्यात आल्या. मात्र, या मुलाखती रद्द करण्याची वेळ का आली? मुलाखातीपूर्वीचे नियोजन केले गेले नव्हते का? सोशल डिस्टन्ससाठी नियोजन का केले नाही? असे अनेक प्रश्‍न अनुत्तरीतच आहेत. 

Video : जिल्हा रुग्णालयातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा, कसा? तो वाचाच

sakal_logo
By
शिवचरण वावळे

नांदेड : कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय नांदेडच्या वतीने मंगळवारी (ता.सात) कंत्राटी पद्धतीने थेट मुलाखतींचे आयोजन केले होते. त्यामुळे श्री गुरु गोविंद सिंह स्मारक जिल्हा रुग्णालय येथे उमेद्‍वार एकत्र आले होते. दरम्यान आवश्यकतेपेक्षा जास्त उमेद्‍वार एकत्र आल्याने या मुलाखती रद्द कराव्या लागल्या. एकंदरीतच नागरिकांना सांगणाऱ्या जिल्हा रुग्णालयातच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला.  

देशभरात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत असून त्यावर वेळीच नियंत्रण आणणे अत्यावश्‍यक झाले आहे. या उद्देशाने आरोग्य विभागाच्या दृष्टीने तयारीही सुरु करण्यात आलेली आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आरोग्य अधिकारीपासून ते नर्स-ब्रदर, सफाई कामगार, लॅब असिस्टंट मॅनेजर अशा विविध पदांसाठी तात्पुरत्या स्वरूपात आरोग्य विभागात कंत्राटी पद्धतीने जागा भरण्यात येत आहेत. त्यादृष्टीने नांदेडच्या श्री गुरुगोविंदसिंग स्मारक जिल्हा शासकीय रुग्णालयातही विविध पदासाठी सकाळी दहा वाजता थेट मुलाखती घेण्यात येणार होत्या. परंतु कोरोनासारख्या आजाराला हरवण्यासाठी सोशल डिस्टन्स हे महत्त्वाचे असतानाही ते पाळले गेले नाही. अथवा तशी काळजीही घेतली नाही.

हेही वाचा - कोरोना इम्पॅक्ट : इतिहासजमा खजिनाच येतोय जोडीला

रुग्णालय प्रशासनाने सोशल डिस्टन्स ठेवण्यासाठी कुठल्याही प्रकारची व्यवस्था करण्यात आली नव्हती. त्यामुळे मुलाखतीसाठी आलेले उमेदवार हे दाटीवाटीने रुग्णलयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उभे होते. परिणामी, प्रशासनाची चांगलीच धावपळ झाली असून, उमेदवारांना पांगविण्यासाठी सुरक्षारक्षक, कर्मचारी तसेच पोलिसांना तारेवरची कसरत करावी लागली. वास्तविक पाहता जिल्हा रुग्णालयात मुलाखत देणाऱ्यांची प्रचंड गर्दी होणार, याची कल्पना असतानाही प्रशासनाच्या वतीने कुठल्याही प्रकारची काळजी घेण्यात आली नव्हती.  

हे देखील वाचाच वर्तमानपत्रच आहे जीवाभावाचा मित्र

गर्दीमुळे मुलाखती रद्द
कोरोनाचा उद्रेक रोखण्यासाठी आरोग्य सेवा अधिकारी व कर्मचारी यांची महसूल निवासस्थान कामठा,  उपजिल्हा रुग्णालय मुखेड,  शासकीय आयुर्वेदिक महाविद्यालय अशा विविध ठिकाणी विविध पदावर नियुक्ती करण्यात येणार होती. यासाठी शासकीय रुग्णालय, महापालिका रुग्णालय तथा नगरपालिका रुग्णालयातून सेवानिवृत्त झालेल्या आरोग्य अधिकारी, कर्मचारी, परिचारिका यांनाही या मुलाखतीस बोलविण्यात आले होते.  श्री गुरुगोविंदसिंग रुग्णालयात आयोजित केलेल्या या मुलाखती १०२ जागांसाठी घेण्यात येणार होत्या.  परंतु आवश्यकतेपेक्षा जास्त उमेदवार आल्याने ऐनवेळी या मुलाखती रद्द कराव्या लागल्या.  

नातेवाईकांच्या गर्दीमुळे मुलाखती रद्द 
जिल्ह्यामध्ये कुठलेही कोरोना सदृश्य परिस्थिती उद्भवू नये म्हणून त्यापूर्वीचे नियोजन करण्यासाठी आरोग्य विभागामध्ये शंभरपेक्षा अधिक जागा भरण्यात येणार होत्या.  परंतु मुलाखतीस आलेल्या अनेकांसोबत नातेवाईकांनी गर्दी केल्यामुळे ही मुलाखत रद्द करावी लागली आहे.    
- डॉ.निळकंठ भोसीकर, जिल्हा शल्यचिकित्सक नांदेड