esakal | परभणी मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा बँकेचे ग्राहक, शेतकऱ्यांची गैरसोय

बोलून बातमी शोधा

file photo

केवळ दोन कर्मचाऱ्यावर मानधन वाटप करण्याची जबाबदारी आल्यामुळे बँकेचे कर्मचारी व लाभार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली या ठिकाणी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी पुढे आली आहे.

परभणी मध्यवर्ती बँकेच्या कळमनुरी शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा बँकेचे ग्राहक, शेतकऱ्यांची गैरसोय
sakal_logo
By
संजय कापसे

कळमनुरी ( जिल्हा हिंगोली ) : येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या मुख्य व शहर शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा असून शासनाच्या विविध कल्याणकारी योजनामधील लाभार्थ्यांनी आपले मानधन उचलण्यासाठी सोमवार (ता. 12) ला बँकेसमोर मोठी गर्दी केली. केवळ दोन कर्मचाऱ्यावर मानधन वाटप करण्याची जबाबदारी आल्यामुळे बँकेचे कर्मचारी व लाभार्थ्यांची मोठी तारांबळ उडाली या ठिकाणी आवश्यक असलेल्या कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा तातडीने भरण्याची मागणी पुढे आली आहे.

परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या मुख्य व शहर शाखेत कर्मचाऱ्यांची वानवा निर्माण झाली आहे मुख्य शाखेत केवळ चार कर्मचाऱ्यावर बँकेचे कामकाज पाहिले जात आहे तर शहर शाखेत दोन कर्मचारी व एक शिपाई अशा तीन अधिकारी कर्मचाऱ्यांकडून कामकाज पाहिले जात आहे त्यातच आता या दोन्ही शाखेतील तीन कर्मचारी आजाराने बाधित झाले आहेत परभणी जिल्हा मध्यवर्ती बँकेकडे शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ,शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई अनुदान, पंतप्रधान किसान योजना, या व इतर शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचे अनुदान शेतकरी व लाभार्थ्यांच्या त्यांच्या खात्यात जमा होऊन लाभार्थ्यांना वाटप करण्यात येते.

त्यामुळे बँकेच्या दोन्ही शाखेत शेतकरी व विविध कल्याणकारी योजना मधील लाभार्थी आपले जमा झालेले अनुदान व मानधन उचलण्यासाठी नियमित गर्दी करतात त्यामुळे बँकेचे कर्मचारी अडचणीत सापडले आहेत त्यातच आता मुख्य शाखे मधील एक व शहर शाखेमधील दोन कर्मचारी आजाराने बाधित झाल्यामुळे अडचणी निर्माण झाल्या आहेत त्यातच आता शासनाच्या श्रावणबाळ निराधार योजनेमधील 29 गावातील 2962 लाभार्थ्यांना मिळणारे अनुदान शहर शाखेकडून वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे त्यामुळे सोमवार (ता. 12) ला कल्याणकारी या योजनेचे अनुदान मिळवण्यासाठी लाभार्थी वृद्ध नागरिकांनी शहर शाखेसमोर मोठी गर्दी केली होती.

या ठिकाणी केवळ एकच कर्मचारी असल्यामुळे बँक प्रशासनाकडून गौळबाजार शाखेतील एका कर्मचाऱ्याची कळमनुरी शहर शाखेत प्रतिनियुक्ती करण्यात आली आहे या दोन कर्मचाऱ्यावर च लाभार्थी नागरिकांना मिळणारे अजून वाटपाचे काम येऊन पडले आहे त्यामुळे बँकेत मोठी गर्दी झाली असून सोशल डिस्टन्सचा पुरता फज्जा उडाला दुसऱ्या बाजूला लाभार्थी नागरिकांची मोठी संख्या तर बँकेत केवळ दोनच कर्मचारी असल्यामुळे या कर्मचाऱ्यांची व लाभार्थी नागरिकांचीही यामुळे मोठी तारांबळ उडाली परभणी येथील मुख्य शाखेकडून या ठिकाणी रिक्त असलेल्या कर्मचाऱ्यांच्या जागा तातडीने भरून बँकेची सभासद ग्राहक शेतकरी लाभार्थ्यांची होणारी अडचण दूर करावी अशी मागणी या निमित्ताने आता पुढे आली आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे