esakal | कोरोनाच्या काळात सुपारी अन् तंबाखूचा दुहेरी फटका, कोण म्हणाले ते वाचा

बोलून बातमी शोधा

tobbaco

कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गुटखा, सुपारी व तंबाखूमुळे संसर्गाचा प्रसार वाढण्यात मदत होते आणि सेवन (खाणाऱ्या) करणाऱ्यांच्या फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. असा दुहेरी फटका बसत असल्याने पानपट्टी अर्थात पानशॉप सुरू करण्यासाठी सध्या तरी परवानगी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहे.

कोरोनाच्या काळात सुपारी अन् तंबाखूचा दुहेरी फटका, कोण म्हणाले ते वाचा

sakal_logo
By
विकास गाढवे

लातूर : कोरोनाचा संसर्ग वाढत असताना गुटखा, सुपारी व तंबाखूमुळे संसर्गाचा प्रसार वाढण्यात मदत होते आणि सेवन (खाणाऱ्या) करणाऱ्यांच्या फुफ्फुसावर विपरित परिणाम होतो. असा दुहेरी फटका बसत असल्याने पानपट्टी अर्थात पानशॉप सुरू करण्यासाठी सध्या तरी परवानगी देता येणार नाही, असे स्पष्टीकरण जिल्हाधिकारी जी. श्रीकांत यांनी दिले आहे. लातूर पानशॉप व्यापारी असोसिएशनने केलेल्या मागणीवर ते बोलत होते.


शहरातील पानशॉप व्यवसायावर आठ हजार कामगारांचा उदरनिर्वाह अवलंबून असून पाच महिन्यापासून व्यवसाय बंद असल्याने उपासमारीची वेळ आली. कामगारांकडे उदरनिर्वाहाचे पर्यायी साधन नसल्याने त्यांची आर्थिक कोंडी झाल्याने पानशॉप सुरू करण्यासाठी परवानगी देण्याची मागणी असोसिएशने केली होती. या विषयावर गुरूवारी (ता. 20) रात्रीच्या फेसबुक लाईव्ह कार्यक्रमात श्रीकांत यांनी सविस्तर खुलासा केला. पानशॉपमधून कोरोनाचा संसर्ग वाढू शकणाऱ्या मालाचीच विक्री होणार आहे. थुंकीमुळे कोरोनाचा प्रसार होत असल्याचे निष्पन्न झाले आहे. यामुळे थुंकणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाईचे आदेश सरकारने दिले आहेत.

तुळजापूरला जाणाऱ्या रस्त्याचा काही भाग लागला कोसळू, वाहतूक झाली बंद

लोक पान, तंबाखू, सुपारी व गुटखा खाऊन थुंकणारच असल्याने हा प्रकार कोरोना वाढीसाठी पोषक ठरणारा आहे. दारूपेक्षा जास्त व्यसन लोकांना सुपारी व गुटख्याचे आहे. जिल्ह्यात असे व्यसन असलेल्यांची संख्या मोठी असून यामुळे पानपट्टी सुरू करणे समाजासाठी व सर्वांसाठीच धोकादायक ठरू शकते. व्यसन करणाऱ्यांच्या फुफ्फुसावर घातक परिणाम होत असून फुफ्फुसाची ताकद कमी होत आहे. अशा लोकांवर कोरानाचा आघात होऊ शकतो. दुहेरी फटका बसत असल्यानेच पानपट्टी व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देता येत नसल्याचे जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सांगितले.

`त्यांना` चोरीचे फळ मिळेल !
पानपट्टी बंद असतानाही जिल्ह्यात चोरून तसेच जादा भावाने गुटखा तसेच सुगंधी तंबाखू मिश्रित घासलेल्या सुपारीची विक्री जोरात सुरू आहे. अनेकजण चोरून हा व्यवसाय करत असून चोरूनच सुपारी व गुटखा खात आहेत. कोरोनाचे संकट असताना तरी काळजी घेण्याची गरज असताना लोक आपल्या जीव धोक्यात घालत आहेत. यामुळे विकणाऱ्यांना तसेच खाणाऱ्यांना या चोरीचे फळ मिळेल, अशा इशारा जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी दिला.

(संपादन - गणेश पिटेकर)