उमरगा, (जि. धाराशिव) - शिवसेना उपनेते तथा माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी आमदार असताना नवीन बसस्थानकासाठी मंजुरी घेत निधी मिळवून देण्यासाठी प्रयत्न केले. इमारतीसाठी पाच कोटीची प्रशासकीय मान्यता असली तरी, पुढील काळात आणखी निधी देण्यासाठी प्रयत्न राहील असे आश्वासन परिवहन मंत्री तथा पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.