माझा देवावर विश्वास, लातूरला रेल्वेने पाणी आणावे लागणार नाही - पालकमंत्री

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 25 ऑगस्ट 2019

लातूरसाठी रेल्वेने पुन्हा पाणी आणावे लागणार नाही, जिल्ह्याचा इतिहास पाहता येथे परतीचा पाऊस चांगला होतो. माझा देवावर विश्‍वास असून या पावसाचेच पाणी लातूरला मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रविवारी (ता. 25) औशात व्यक्त केला.

औसा,(जि. लातूर) ः लातूरसाठी रेल्वेने पुन्हा पाणी आणावे लागणार नाही, जिल्ह्याचा इतिहास पाहता येथे परतीचा पाऊस चांगला होतो. माझा देवावर विश्‍वास असून या पावसाचेच पाणी लातूरला मिळेल, असा विश्‍वास पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी रविवारी (ता. 25) औशात व्यक्त केला. छावा संघटनेचे विजयकुमार घाडगे यांनी उपोषण मागे घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. 

रेल्वेने पाणी आणल्यावर लातूर देशभर चर्चेत आले होते. यंदाही दुष्काळी परिस्थितीमुळे प्रशासनाने पुन्हा रेल्वेने पाणी आणण्याची तयारी केल्याचा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हे उत्तर दिले.

लातूर जिल्ह्यात पाण्याची आणीबाणी असल्याने यंदाही लातूरसाठी रेल्वेने पाणी आणावे लागेल, अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.

त्यावर पालकमंत्र्यांनी आपण सकारात्मक विचार करीत असून यंदा परतीचा चांगला पाऊस पडून या भागातील लोकांना आणि जनावरांना पाणी उपलब्ध होईल, अशी आशा व्यक्त केली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: no water railway for latur