
अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एक एप्रिल 2019 पासून मंजूर झालेले अनुदानही राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली रद्द करण्यात आले.
सिरसाळा (जि.बीड) : 13 सप्टेंबर 2019 नुसार राज्यातील प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेतील विनाअनुदानित शिक्षकांना प्रचलित धोरणानुसार शंभर टक्के निधी वितरणाचा आदेश काढण्यात यावा. या मागणीसाठी गेल्या पंचवीस दिवसांपासून आझाद मैदानावर शिक्षक समन्वय संघाने धरणे आंदोलन सुरू केले आहे. तालुक्यातील शिक्षकांचा मोठा सहभाग दिसत आहे. गेल्या अठरा वर्षांपासून बिनपगारी ज्ञान देण्याचे काम करत आहे. शिक्षण, अर्थखाते एकमेकांकडे बोट दाखवत वेळ मारून नेत असल्याने आंदोलन करण्यात अर्धे आयुष्य खर्ची झाले.
शासनाकडून पाच-पाच वेळा मूल्यांकन होऊनही वरचेवर शाळा तपासणीच्या नावाखाली झुलवत ठेवण्यात आले आहे. यामुळेच लॉकडाउन हवालदिल झालेल्या सत्तावीस शिक्षकांनी मरणाला जवळ केले आहे. अनेकजण सेवानिवृत्तीच्या उंबरठ्यावर आहेत. एक एप्रिल 2019 पासून मंजूर झालेले अनुदानही राज्य सरकारने कोरोनाच्या नावाखाली रद्द करण्यात आले.
वाचा - स्वप्नं पापण्यातले पापण्यातच विरले, कुटुंबाचा आधार होऊ पाहणाऱ्या जिद्दी प्रतिक्षाला काळाने अडविलेच
शिक्षकांना अनुदानासाठी आता विद्यार्थीही आंदोलन करताना दिसत आहे. यासाठी शिक्षक समन्वय संघाच्या नेहा गवळी, दीपक कुलकर्णी, के.पी.पाटील, सुजाता चोखंडे, ज्ञानेश चव्हाण, राहुल कांबळे, संतोष वाघ, रविकांत जोजारे, ज्ञानेश्वर शेळके, कर्तारसिंग ठाकूर आदी मेहनत घेत आहेत.
पगार नसल्याने अँकरिंग, शिकवणी,गृहउद्योग चालऊन कुटुंब चालवतो, शिक्षक समन्वय संघाचे हे आंदोलन 25 दिवसापासून सुरू असल्याने प्रचलित नियमानुसार अनुदान घेतल्याशिवाय मैदान सोडणार नाही
- सुमेध डोके, सहशिक्षक, औरंगाबाद
Edited - Ganesh Pitekar