पीपीपी नको,शासकीय महाविद्यालयच हवे! परभणीकर देणार लढा

परभणी : परभणी जिल्ह्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे (पीपीपी) नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच हवे आहे, अशा भावना रविवारी (ता.२९) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
परभणी : परभणी जिल्ह्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे (पीपीपी) नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच हवे आहे, अशा भावना रविवारी (ता.२९) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.

परभणी : परभणी (Parbhani) जिल्ह्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे (पीपीपी) (Public Private Parternship) नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच (Government Medical College) हवे आहे, अशा भावना रविवारी (ता.२९) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्या. आता निवेदने व मंत्र्यांच्या कार्यालयाच्या पायऱ्या झिजवणे बस्स झाले. तीव्र लढ्यासाठी सर्वपक्षीय नेत्यांसह सर्वसामान्य परभणीकरांनी वज्रमूठ करावी, असा निर्वाणीचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. बी. रघुनाथ सभागृहात रविवारी (ता.२९) आम्ही परभणीकर या बॅनर खाली सर्वपक्षीय नेत्यांसह जिल्ह्यातील वेगवेगळ्या क्षेत्रात काम करणारे व्यक्ती व सर्वसामान्य नागरिकांची बैठक झाली. यावेळी भदंत उपगुप्त महाथेरो, खासदार संजय जाधव, आमदार सुरेश वरपुडकर, आमदार बाबाजानी दुर्राणी, माजी आमदार सुरेश देशमुख, उपमहापौर भगवानराव वाघमारे, अॅड. अशोक सोनी, प्रताप देशमुख, विजय वाकोडे, माजुलाला, स्वराजसिंह परिहार, जयश्री खोबे, राजन क्षीरसागर आदींची उपस्थिती होती. बैठकीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली.

परभणी : परभणी जिल्ह्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे (पीपीपी) नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच हवे आहे, अशा भावना रविवारी (ता.२९) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
'ई-ग्रामस्वराज' प्रणालीमध्ये परभणी जिल्हा महाराष्ट्रात अव्वल

यावेळी सर्वक्षेत्रातील मान्यवरांच्या सूचना व प्रतिक्रिया यावेळी विचारात घेण्यात आल्या. प्रत्येक क्षेत्रातील व्यक्तींना प्रातिनिधिक स्वरुपात स्वताची सूचना सभागृहात मांडण्याची संधी यावेळी देण्यात आली. यावेळी बोलताना सर्वच मान्यवरांनी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मंजुरीच्या लढ्यात आपापल्या क्षेत्रातील व्यक्तींचे पूर्णपणे योगदान राहणार असल्याची ग्वाही देत. खासगी महाविद्यालयापेक्षा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावे, अशी भावना व्यक्त केली. वेळप्रसंगी तीव्र आंदोलनात सहभाग नोंदविण्याची ग्वाही यावेळी देण्यात आली. परभणीतील सर्व लोकप्रतिनिधी ज्या-ज्या पक्षात आहेत. त्याच पक्षाचे सरकार सत्तेत आहे, असे असतानाही पदरात मात्र काहीच पडत नाही, अशी खंतही काही जनांनी बोलून दाखविली. त्यासाठी लोकप्रतिनिधींचा राज्यस्तरावर रेटा महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त करण्यात आले.

परभणी : परभणी जिल्ह्याला पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिपचे (पीपीपी) नव्हे तर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच हवे आहे, अशा भावना रविवारी (ता.२९) झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत व्यक्त करण्यात आल्या.
औरंगाबादेत शिवसेनेने प्रतीकात्मक कावड यात्रा काढून जपली परंपरा

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मंजुरीसाठीची प्रस्ताव मी स्वतः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे घेऊन गेलो होतो. त्यापूर्वी मंजुरीच्या यादीतही परभणीचे नाव नव्हते. ते आता आले आहे. पंरतू आता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठीचा लढा थांबणार नाही. सर्वसामान्य जनतेनेही यात सहभाग नोंदवावा. मागणीच्या पूर्ततेसाठी लढ्याची दाहकता वाढवावी लागणार आहे.

- संजय जाधव, खासदार

कृषी विद्यापीठासाठी परभणीकरांना रक्त सांडावे लागले होते. आता परत तिच वेळ आली आहे. जनआंदोलनासोबतच भडक आंदोलनाद्वारे सरकारपर्यंत आमची लढाई पोहोचवावी लागणार आहे. शासनाला विचार करण्यास भाग पाडावे लागणार आहे. त्यामुळे आता न थांबता मागणीचा जोर वाढावा लागणार आहे. सरकार आपले आहे. वेळ पडली तर सर्वसामन्यांनी लोकप्रतिनिधीच्या घरासमोर ही आंदोलने करावीत.

- सुरेश वरपुडकर, आमदार

एकमेकांवर आरोपाची ही वेळ नाही. आता निर्णायक लढ्यासाठी सर्वांनी एकत्र आले पाहिजे. तरच आपला हक्क आपल्याला मिळणार आहे. सर्वपक्षीय नेत्यांनी आपापल्या वरिष्ठांकडे यासाठी साकडे घातले पाहिजे. स्थानिक पातळीवर मोठे जनआंदोलन उभारले तरच मागणी पूर्ण होईल. सत्तेत आपण असलो तरी मागणीसाठी रेटा वाढवावा लागणार आहे.

- बाबाजानी दुर्राणी, आमदार

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचा हा लढा आजचा नाही. गेल्या ३५ वर्षांपासून हा प्रश्न लावून धरला जात आहे. परंतू त्यात सातत्य राहले नव्हते. आता हा लढा निर्णायक होत आला आहे. आता शेवटचा रेटा वाढवून आपली अनेक वर्षाची मागणी पूर्ण करून घेतली पाहिजे. राज्यस्तरावर दबाव वाढविण्यासाठी स्थानिक पातळीवरील सर्व नेत्यांनी एकत्र बैठक घेऊन शक्ती एकटवावी लागणार आहे.

- सुरेश देशमुख, माजी आमदार

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com