ही आत्महत्या नव्हे, सरकारने केलेला खून आहे; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या

ही आत्महत्या नव्हे, सरकारने केलेला खून आहे; चिठ्ठी लिहून तरुणाची आत्महत्या
Updated on

गल्लेबोरगांव (ता. खुलताबाद)- येथिल तरुणाने मराठा आरक्षण मिळाले नाही म्हणुन मंगळवारी (ता.11) सकाळी झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली.

किशोर शिवाजी हारदे (वय 26) यांनी सकाळी आपल्या स्वतःच्या शेतात लिंबाच्या झाडाला फाशी घेऊन आत्महत्या केली. घटनेची मिळताच खुलताबाद पोलिस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी मृत किशोर यास खाली उतरवले व त्यांच्या खिशात मोबाईल रोख रक्कम व चिठ्ठी सापडली. त्यात लिहले आहे कि मी आत्महत्या नसुन सरकारने माझा खुन केला आहे आसा उलेख आहे.

किशोर सध्या येवला (जि. नाशिक) येथे एका फायनान्स कंपनीत काम करत होता. तो पोळा सणासाठी गांवकडे आला होता. तो हुशार होता. पण आरक्षणामुळे त्याला सरकारी नोकरीला लागत नसल्यामुळे तो निराश झाला होता असे त्याच्या मित्राने व नातेवाईक सांगत आहेत. त्याच्या पश्चात आई वडिल, भाऊ, भावजाई असा परिवार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Bribe Demand for Running Spa Center Lands Police Personnel in ACB Net
Kaigaon Gambling Racket Exposed in Police Raid at Local Eatery
Beed News
Beed News
Marathi News Esakal
www.esakal.com