
पहिली नोटीस देताच ४४७ उमेदवारांनी खर्च दाखल केला असून, उर्वरित २०२ उमेदवारांना अंतिम नोटीस बजाविण्यात आली आहे
चाकूर (लातूर): ग्रामपंचायत निवडणुकीत झालेल्या खर्च सादर न केल्याने २०२ उमेदवारांना निवडणूक खर्च विभागाने नोटीस बजावली आहे. वेळेत खर्च सादर नाही केल्यास अपात्रतेची कारवाई केली जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
तालुक्यातील २४ ग्रामपंचायतींच्या निवडणुका झाल्या आहेत. यासाठी ६४९ उमेदवारांनी नामनिर्देशनपत्र दाखल केले होत. सदरील उमेदवारांना नियमित निवडणुकीतील खर्च सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. असे असतानाही आजवर अनेक उमेदवारांनी अंतिम खर्च दाखल केलेला नाही.
अखेर ते १७ बैल मुळ मालकास देण्याचे औंढा न्यायालयाचे आदेश
पहिली नोटीस देताच ४४७ उमेदवारांनी खर्च दाखल केला असून, उर्वरित २०२ उमेदवारांना अंतिम नोटीस बजाविण्यात आली आहे. १७ फेब्रुवारी पर्यंत खर्च सादर करावा, अन्यथा जे उमेदवार विजयी झाले आहेत, त्यांचे सदस्यत्व रद्द तर पराभूत उमेदवारांना सहा वर्षांसाठी निवडणूक लढण्यास अपात्र ठरविण्याची कारवाई केली जाणार आहे. उमेदवारांनी वेळीच निवडणूक खर्च विभाग, उपकोषागार अधिकारी सुरेंद्र सुरवसे यांच्याकडे सादर करावा, असे आवाहन तहसीलदार डॉ. शिवानंद बिडवे यांनी केले आहे.
(edited by- pramod sarawale)