हिंगोली जिल्ह्यातील चार गावातील ४३ लोटाबहाद्दरांना नोटिसा, हागणदारीमुक्तीसाठी गुड मॉर्निंग पथक सरसावले 

file photo
file photo
Updated on

हिंगोली : स्वच्छ माझं गाव, सुंदर गाव या उपक्रमांतर्गत गावपातळीवर स्वच्छता मोहीम राबविली जात आहे. त्यानुसार हागणदारी मुक्त गावे करण्यासाठी स्वछता विभागाकडून गुड मॉर्निंग पथकाने सोमवारी (ता. १५) जिल्ह्यातील चार गावातील ४३ लोटा बहाद्दरांना नोटिसा देऊन समज दिली. तसेच  उघड्यावर बसू नये म्हणून गुलाब पुष्प देऊन लोटाबहाद्दरांचा सत्कार करण्यात आला.

जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता ग्रामीण विभागाच्या वतीने गावे हागणदारी मुक्त व्हावेत यासाठी पायाभूत सर्व्हेक्षणा नुसार जिल्हाभरात शौचालय बांधकाम करण्यात आले. मात्र काही गावात शौचालयाचा वापर न करता नागरिक उघड्यावर बसत असून घाणीचे साम्राज्य पसरल्याने आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता दुसऱ्या टप्यात एलओबी, एनएलओबीसाठी सर्व्हेक्षण सुरु आहे. 

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राधाबीनोद शर्मा, अतिरिक्त सीईओ अनुप शेंगुलवार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी धनवंत माळी यांच्या मार्गदर्शनाखाली स्वछता व पाणी ग्रामीण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे व विभागातील कर्मचारी यासाठी प्रयत्न चालविले आहेत.त्यानुसार स्वच्छ माझे गाव, सुंदर माझे गाव या उपक्रमांतर्गत ता. एक ते ३१ मार्च या दरम्यान हा उपक्रम राबविला जात असून गावात साफसफाई स्वच्छता केली जात आहे.

हिंगोली तालुक्यातील कोथळज येथे आठ लोटा बहाद्दरांना नोटिसा देऊन समज देण्यात आली. याचप्रमाणे सेनगाव तालुक्यातील मकोडी येथील दहा, कळमनुरी तालुक्यातील पुयनी येथे पंधरा, तर औंढा तालुक्यातील गणेशवाडी येथील दहा असे एकूण मिळून चार गावातील ४३ लोटा बहाद्दरांना नोटिसा देऊन उघड्यावर पुन्हा बसू नये अशी तंबी दिली. उघड्यावर बसलात तर गुन्हे दाखल केले जातील असे गुड मॉर्निंग पथकाने नागरिकांना सांगितले.

कोथळज येथे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आत्माराम बोन्द्रे यांनी भेट देऊन गावात स्वछता अभियान राबविण्यात आल्याची पाहणी करुन ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. यावेळी कक्षातील श्यामसुंदर मस्के, नंदकिशोर आठवले, गंगासागर राधेश्याम आदींची उपस्थिती होती. तर पुयनी येथे राजेंद्र सरकटे, संतोष भोजे, प्रमोद मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली गावात स्वछता अभियान राबविण्यात आले. तसेच गणेशवाडी येथे रवी सोनवणे, संदीप कांबळे यांच्या उपस्थितीत सार्वजनिक संस्था, शाळा, अंगणवाडी, ग्रामपंचायत, आरोग्य उपकेंद्र आदींचा परिसर स्वच्छ करण्यात आला. काही गावात शौचालय बांधलेले असताना ही नागरिक उघड्यावर बसत आहेत. ज्या नागरिकांकडे शौचालय नाही अशांनी तातडीने ग्रामसेवक यांना संपर्क साधून सौछालय बांधून घेण्याच्या सूचना दिल्या. नागरिकांनी उघड्यावर बसल्याने गावाचा परिसर अस्वच्छ होतो, घाण पसरते, परिणामी नागरिकांचे आरोग्य धोक्यात सापडते यामुळे गावात स्वच्छता कायम राहावी यासाठी गुड मॉर्निंग पथकाच्या माध्यमातून ग्रामस्थांना वचक बसावी हा व्यापक दृष्टीकोन ठेवत लोटा बहाद्दराना भल्या पहाटे अडवून उघड्यावर बसण्यासाठी पाबंदी घालत आहेत , तसेच शौचालयाचे महत्व पटवून देत आहेत. यावेळी गावातील सरपंच, उपसरपंच, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामसेवक सक्रिय सहभाग घेतला आहे.

संपादन- प्रल्हाद कांबळे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com