लातुरात आता ठराविक दिवशीच उघडणार दुकाने, जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

Latur News, Coronavirus
Latur News, Coronavirus
Updated on

लातूर : टाळेबंदीच्या (लॉकडाऊन) तिसऱ्या टप्प्यात राज्य सरकारने ऑरेंज व ग्रीन झोनमध्ये काही उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी दिली होती. त्यानुसार सोमवारपासून (ता. चार) जिल्ह्यात बहुतांश दुकाने उघडली गेली. मात्र, एकाच वेळी सुरू झालेल्या दुकानांमुळे सुरक्षित अंतराचा बोजवारा उडाला. यामुळे जिल्हाधिकारी जी.श्रीकांत यांनी दुकानांचे वर्गीकरण करून त्यांना वार ठरवून दिला असून ही दुकाने आता आठवड्यातून ठराविक दिवशीच सकाळी आठ ते दुपारी तीन या वेळेत सुरू राहणार आहेत.


यामुळे बाजारपेठेत ग्राहक व व्यावसायिकांच्या गर्दीला आवर बसणार आहे. तिसऱ्या टाळेबंदीच्या पहिल्या दिवसापासून सुरक्षा नियमांचे बंधन घालून उद्योग व व्यवसाय सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. जिल्हा ऑरेंज झोनमध्ये असलेल्याने जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी भाजी बाजार बंद करून उर्वरित व्यवसाय सकाळी सात ते सायंकाळी सहा या वेळेत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती. भाजीपाला गाड्यावर फिरून विकण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, पहिल्या दिवसापासूनच बाजारात मोठी गर्दी होऊ लागली. सर्वच दुकानांत ग्राहकांनी मोठी गर्दी केली. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजना धुळीस मिळाल्या. यामुळे आठवड्यातून ठराविक दिवस व वेळ ठरवून देऊन व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी घेतला आहे. यात रूग्णालये, औषधी दुकाने व वैद्यकीय सेवांना सुट देण्यात आली असून हे व्यवसाय व सेवा आठवडाभर चोवीस तास सुरू ठेवण्यास परवागनी देण्यात आली आहे.

कुस्तीगिरांच्या ‘शड्डू’चा आवाज ओझ्याखाली, महाराष्ट्र केसरी उपविजेत्याची खंत

आठवड्याचे दिवस व व्यवसाय
1) सोमवार व मंगळवार - ऑटोमोबाईल्स, कॉम्प्युटर, इलेक्ट्रॉनिक्स, टायर्स, बॅटरी, रेडीमेड फर्निचर व मोबाईल शॉपी.
2) बुधवार व गुरूवार - रेडीमेड कापड, कापड, भांडी, टेलरिंग, फुटवेअर, रस्सी, पत्रावळी, ज्वेलरी, जनरल स्टोअर्स, सुटकेश, बॅग.
3) शुक्रवार व शनिवार - स्टेशनरी, कटलरी, सायकल स्टोअर्स, स्टील ट्रेडर्स, स्क्रॅप मर्चंट, हार्डवेअर, बिल्डींग मटेरिअल, पेंट व अन्य व्यवसाय.
4) दररोज (रविवार वगळून) - शेती विषयक, बी बियाणे, किटकनाशक, किराणा, खासगी अस्थापना असलेले सीए व वकीलांची कार्यालये आदी.


लातुरात टाळेबंदी तीनमध्ये सुरक्षा उपाययोजनांचे तीनतेरा, पालकमंत्र्यांची चिंता

दाढी कटींग घरपोच सेवा
जिल्हाधिकारी श्रीकांत यांनी सलुन व्यवसायाची दुकाने आठवड्यातील सर्व दिवस बंद करण्याचे आदेश दिले असून या व्यावसायिकांना सकाळी सात ते सायंकाळी सहा या काळात घरपोच सेवा देण्याची मुभा दिली आहे. यामुळे नागरिकांना व्यावसायिकांना घरी बोलावून दाढी व कटींग करता येणार आहे. सर्व व्यावसायिकांना सुरक्षित अंतराचे पालन करण्यासह चालक, मालक, कर्मचारी व कामगारांना आरोग्य सेतू अॅप वापरणे बंधनकारक करण्यात आले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Drought Scorches Kharif Crops Farmers Seek Relief! Guardian Minister Narhari Zirwal Inspects Crop Damage
Loha Savargaon-Bardapur Road
Aadul Theft
Teachers Agitation
Marathi News Esakal
www.esakal.com