पोलिसांचे आता महाट्राफीक ॲप

file photo
file photo
Updated on

नांदेड : राज्यातील वाहतुक व्यवस्था सुरळीत व्हावी व विनापरवाना वाहन चालविणाऱ्यावर वाहतुक पोलिसांचा वचक बसावा यासाठी राज्याचे पोलिस महासंचालक यांनी महाट्रॉफिक ॲप सुरू केले आहे. या ॲपचा उपयोग नागरिकांनी व वाहनधारकांनी करावा असे आवाहन पोलीस अधिक्षक विजयकुमार मगर, अतिरिक्त पोलीस अधिक्षक दत्ताराम राठोड आणि विजय पवार यांनी केले आहे.

राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जायस्वाल यांनी राज्याच्या वाहतूकीत सुधारणा व्हावी म्हणून महाट्रॉफिक ॲप सुरू केले आहे. हे संपुर्ण महाराष्ट्रात कार्यरत करता येते त्यासाठी गुगल प्लेस्टोअरमधून तेॲप डाऊनलोड करायचे आणि त्यातील माहितीचा उपयोग करून बरीच माहिती घेता येते. जनतेमार्फत बेशीस्त वाहन चालकांवर कार्यवाही करण्याची सुविधा या ॲपमध्ये उपलब्ध आहे. या ॲपला आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड केल्यानंतर त्यावर आपला मोबाईलनंबर देताच हा ॲप कार्यान्वित होतो. या ॲपच्या माध्यमातून आपले स्वत: चे वाहन नोंद करता येते. या ॲपमध्ये ई- चालन पाहता येते. आपल्या किंवा आपल्या नातेवाईकांच्या वाहनाला ई- चालन झाले असेल तर त्याचे पैसे राज्यातील कोणत्याही वाहतूक पोलिसाकडे भरून पावती घेता येते.

वाहतूक नियमांची पायमली करणाऱ्यांविरुध्द 
नागरीकच कार्यवाही करू शकतात

या ॲपमध्ये नागरीकांचा अहवाल (सीव्हीलियन रिपोर्ट) असे एक ऑपशन आहे. या ऑपशेनमध्ये वाहतूक नियमांची पायमली करणाऱ्यांविरुध्द नागरीकच कार्यवाही करू शकतात. त्यांनी त्या बेशिस्त आणि कायद्याला तोडणाऱ्या वाहनांचा फोटो ॲपलोड केल्यास त्यावर कार्यवाही होणार आहे. याच ऑपशेनमध्ये दुसऱ्या प्रकारात घटनेचा अहवाल (इंसीडंट रिपोर्ट) असा एक प्रकार आहे. ज्यावर वाहतूकीला अडथळा आणणाऱ्या कोणत्याही प्रकाराची फोटो अपलोड केली. तर त्या ठिकाणी असलेली वाहतूकीची कोंडी दुरू करण्यात येईल.


पोलिसांवर नियंत्रण

अत्यंत अद्यावत अशा या ॲपच्या माध्यमातून पोलिस आपल्या नियमांची तंतोतंत पालन करतील आणि वाहनधारकांनी चुक केल्यास नागरीक त्याचे फोटो घेवून त्यावर कार्यवाही करू शकतील. सोबतच एखादा अपघात झाला तर त्याबद्दलची माहिती त्वरीत प्रभावाने राज्याच्या नियंत्रण कक्षाला मिळेल आणि राज्याचे नियंत्रण कक्ष अत्यंत द्रुतगतीने त्यावर मदत करण्यासाठी पोहचेल. या महाट्रॉफिक ॲपचा जास्ती जास्त जनतेने उपयोग घ्यावा असे आवाहन वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक चंद्रशेखर कदम यांनीही केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

The decision is expected to make travel easier and safer for thousands of pilgrims travelling to and from Pandharpur.
The protesters demanded an impartial inquiry into the alleged incidents, action on examination irregularities and accountability from the Union Education Minister.
The incident also caused damage to a soybean crop, while the exact cause of the fire will be determined after a technical inspection.
Dramatic Chase in Chhatrapati Sambhajinagar Ends with Safe Rescue of Minor Girl
Marathi News Esakal
www.esakal.com