उस्मानाबाद जिल्ह्यातील दुकाने आता रात्री नऊपर्यंत राहणार सुरु, जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश

सयाजी शेळके
Tuesday, 27 October 2020

दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाजारपेठ आता रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे.

उस्मानाबाद : दिवाळी सणाच्या पूर्वसंध्येला जिल्ह्यातील बाजारपेठ आता रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू ठेवण्याचा निर्णय जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी घेतला आहे. मंगळवारी (ता.२७) याबाबत आदेश काढण्यात आले आहेत. त्यामुळे सामान्य नागरिकांसह आता दुकानदारांनाही याचा फायदा होणार आहे. असं असलं तरी कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत. जिल्ह्यासह राज्यात कोरोनाचा ससंर्ग सुरू झाल्यानंतर वेगवेगळ्या उपाययोजना करण्यात आल्या.

पथ विक्रेता, फेरीवाल्यांना मिळेना कर्ज, पंतप्रधान आत्मनिर्भर योजना कागदावरच 

संपूर्ण राज्य आणि देशातही लॉकडाऊन करण्यात आले. असेच काहीसे नियम जिल्ह्याची लागू होते. एप्रिल-मे महिन्यामध्ये याबाबत मोठ्या प्रमाणावर नियमांचे पालन करावं लागत होते. लॉकडाऊनमुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही मुश्कील होते. दरम्यान सध्या कोरोना नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे प्रशासनाने काही बाबींमध्ये शिथिलता आणली आहे. पूर्णपणे सर्व निर्बंध उठवले नसले तरी काही ठराविक बाबी वगळता इतर सर्व प्रक्रिया नेहमीप्रमाणे सुरू झाल्या आहेत. शहरासह जिल्ह्यात दुकानाची वेळ सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत होती.

दगाफटका झाला तर उत्तर देऊ, संभाजीराजे छत्रपतींचा मराठा आरक्षणावरुन सरकारला इशारा

आता यामध्ये बदल करण्यात आला आहे. येत्या पंधरा दिवसात दिवाळीचा सण साजरा होणार आहे. त्यासाठी बाजारपेठेमध्ये वेगवेगळ्या वस्तूंचे आगमन झालं आहे. शिवाय खाद्यपदार्थ बनवण्यासाठी मोठ्या प्रमाणावर बाजारपेठ फुलली आहे. त्यातच कोरोनाचे चित्र पूर्णतः नियंत्रण असल्याने जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत पुन्हा एकदा शिथिलता आणली आहे. यापूर्वी सकाळी नऊ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत जिल्ह्यात दुकाने सुरू होते. आता ही वेळ रात्री नऊ वाजेपर्यंत वाढवण्यात आली आहे. त्यामुळे रात्रीच्या कालावधीत नागरिकांना विविध वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडता येणार आहे. याचा फायदा सामान्य नागरिकांसह व्यापारी, दुकानदारांनाही होणार आहे. दरम्यान असलं तरी कोरोनाचं पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. त्यामुळे फिजिकल डिस्टन्सिंगसह कोरोना नियंत्रणाचे सर्व नियम नागरिकांना पाळावे लागणार आहेत, अन्यथा दंडात्मक, फौजदारी कारवाईची टांगती तलवार असणार आहे.

संपादन - गणेश पिटेकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Now Markets Open Still Nine PM In Osmanabad District