esakal | उमरगा येथे ५८ दिवसात कोरोना बाधितांची संख्या ९३६ तर ६१९ जण झाले कोरोनामुक्त
sakal

बोलून बातमी शोधा

corona

कोरोना संसर्गाचा फेरा कांही केल्या थांबत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सोमवारी (ता. २४) उमरग्यातील गुंजोटीत घेण्यात आलेल्या अन्टीजेन टेस्टमध्ये दोन तर मुरुममध्ये पाच कोरोना पॉझिटिव्ह आले. तर २३ तारखेला पाठविलेल्या ९८ स्वॅबपैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता ५८ दिवसात बाधितांची संख्या ९३६ पर्यंत गेली आहे.

उमरगा येथे ५८ दिवसात कोरोना बाधितांची संख्या ९३६ तर ६१९ जण झाले कोरोनामुक्त

sakal_logo
By
अविनाश काळे

उमरगा (उस्मानाबाद) : कोरोना संसर्गाचा फेरा कांही केल्या थांबत नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे. सोमवारी (ता. २४) उमरग्यातील गुंजोटीत घेण्यात आलेल्या अन्टीजेन टेस्टमध्ये दोन तर मुरुममध्ये पाच कोरोना पॉझिटिव्ह आले. तर २३ तारखेला पाठविलेल्या ९८ स्वॅबपैकी १९ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे आता ५८ दिवसात बाधितांची संख्या ९३६ पर्यंत गेली आहे.

शहर व तालुक्यात कोरोना संसर्ग झपाट्याने वाढत चालला आहे. ९३६ पैकी उमरगा शहरात ५१५ तर ग्रामीणमध्ये ४२१ रूग्ण संख्या झाली आहे. आत्तापर्यंत २९ पॉझिटिव्ह रूग्णांचा मृत्यु झाला आहे. तर ६१९ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला असून २८८ जणावर उपचार सुरू आहेत. रविवारी पाठविलेल्या ९८ स्वॅबचा अहवाल मंगळवारी प्राप्त झाला. त्यात १९ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले असून त्यात शहरात अकरा रुग्ण असून शिवपुरी कॉलनी दोन, अजय नगर दोन, आरोग्य नगर एक, बँक कॉलनी तीन, हमीद नगर दोन, चिंचोळे गल्ली एक, बालाजी नगर एकतर ग्रामीणमध्ये येणेगुरला येथे सात तर मुरूमला एक रूग्ण आढळून आला आहे. 
 
६१९ जणांना मिळाला डिस्चार्ज... 

कोरोनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असली तरी लोकांमध्ये सुरक्षिततेच्यादृष्टीने गांभीर्य दिसत नाही. मंगळवारी (ता.२५) महालक्ष्मीच्या सणाच्या निमित्ताने बाजारपेठेत तोबा गर्दी होती. विक्रेत्यासह अनेक नागरिकांच्या तोंडावर मास्क नव्हते. आतापर्यंत ६१९ जणांना डिस्चार्ज मिळाला आहे. सध्या २८८ जणांवर उमरगा, मुरुम तसेच परजिल्हयात उपचार सुरू आहेत, शिवाय होम आयसूलेशनमध्ये रूग्ण औषधोपचार घेत आहेत. 

संपादन - सुस्मिता वडतिले 

loading image
go to top