
परभणी : परभणी शहरात मुंबईहून परतलेल्यानंतर क्वारंटाइन केलेल्या एका संशयित २८ वर्षीय तरुण रुग्णाचा स्वॅब गुरुवारी (ता. ११) पॉझिटिव्ह आला. परभणी जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या शतकाच्या उंबरठ्यावर असून एकूण ९२ झाली आहे.
परभणी शहरातील सरफराजनगर भागात मुंबईहून परतलेल्या एका तरुणाने स्वतःची वैद्यकीय तपासणी करीत क्वारंटाइन केले होते. जिल्हा शासकीय रुग्णालयाने त्याचे स्वॅब घेतले अन् तपासले तेव्हा तो रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे आढळून आले. जिल्हा शासकीय रुग्णालयाने लगेच त्या कर्मचाऱ्याच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध सुरू केला आहे. महानगरपालिका प्रशासनाने तातडीने या नगरात धाव घेऊन निर्जंतुकीकरणाचे काम सायंकाळी उशिरा सुरू केले होते.
हेही वाचा व पहा : Video : परभणीच्या चित्रपटगृहांचे बुडाले एक कोटींचे उत्पन्न !
आणखी तिघे कोरोनामुक्त
कोरोना विषाणूचा संसर्ग झालेले आणखी तिघे कोरोनामुक्त झाले असून त्यांना गुरुवारी (ता.११) जिल्हा शासकीय रुग्णालयातून घरी पाठविण्यात आले. यात परभणी शहरातील मातोश्रीनगर, इठलापूर मोहल्ला आणि माखणी (ता. गंगाखेड) येथील रुग्णांचा समावेश आहे.
आता जिल्हा शासकीय रुग्णायातील कोविड कक्षात केवळ १२ रुग्ण उपचार घेत आहेत. आज घडीला परभणी जिल्ह्यात एकूण पॉझिटीव्ह रुग्णांची संख्या ९२ झाली आहे. त्यापैकी ७७ जण कोरोनापासून मुक्त होऊन घरी परतले आहेत. तिघांचा आतापर्यंत कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तर १२ जणांवर उपचार सुरु आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.
आठ जणांचा अहवाल निगेटिव्ह
मानवत (जि.परभणी): मानवत शहरातील कोक्कर कॉलनी भागात राहणाऱ्या कोरोना पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कात आलेल्या आठ जणाचे स्वॉब रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. कोक्कर कॉलनी भागात राहणारी ४४ वर्षीय व्यक्ती दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्याने खळबळ निर्माण झाली होती. नगर परिषद प्रशासनाने कोक्कर कॉलनी हा भाग सील करून प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या होत्या. त्याप्रमाणे संबंधित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या १४ जणाना क्वारंटाइन करून आठ जणांचे स्वॉब तपासणीसाठी घेण्यात आले होते. गुरुवारी (ता.११) याबाबत अहवाल प्राप्त झाले असून सर्व आठही अहवाल निगेटिव्ह प्राप्त झाल्याने प्रशासनाने सुटकेचा निश्वास टाकला.
हेही वाचा : सांगा कसे होणार ‘घरकुला’चे स्वप्न साकार? -
सहा गावांचे प्रतिबंधात्मक आदेश मागे
परभणी जिल्ह्यातील देवगावफाटा, कमलापूर, पिंपरी, मैराळ सावंगी, कारेगाव व चिकलठाणा या सहा गावांत कोरोनाबाधित रुग्ण आढळून आल्याने ही गावे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून २६ मे रोजी जाहीर करण्यात आली होते. परंतु, १४ दिवसांत या गावांत रुग्ण आढळून न आल्याने या गावाचे प्रतिबंधात्मक आदेश रद्द करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांनी गुरुवारी (ता. ११) सकाळी दिल्या आहेत.
परभणी जिल्ह्यात कोरोना विषाणू संसर्गाची लागन झालेले अनेक रुग्ण ग्रामीण भागात आढळून आले आहेत. त्यामुळे ता. २६ मे रोजी जिल्ह्यातील देवगावफाटा (ता. सेलू), कमलापूर (ता.पूर्णा), पिंपरी (ता. गंगाखेड), मैराळ सावंगी (ता. गंगाखेड), कारेगाव (ता. परभणी) व चिकलठाणा (ता. सेलू) या सहा गावांना ता. २६ मे रोजी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून या गावांतील रहिवाशांना बाहेर पडता येत नव्हते. तसेच बाहेरील व्यक्तींना या गावात जाण्यास प्रतिबंध करण्यात आला होता.
१४ दिवसांपासून सर्वेक्षण सुरू
या सहा गावांत कोरोनाचे रुग्ण आढळून आल्याने या ठिकाणी गेल्या १४ दिवसांपासून सर्वेक्षण सुरू करण्यात आले होते. परंतु, गेल्या १४ दिवसांत या गावांमध्ये कोरोना विषाणूची बाधा झालेला किंवा त्याची लक्षणे असणारा एकही रुग्ण आढळून आला नाही. त्यामुळे या गावांना लागू करण्यात आलेला प्रतिबंधित क्षेत्राचा आदेश रद्द करावा, अशी विनंती आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली होती.
परभणी जिल्हाचे कोरोना मीटर
एकूण पॉझिटिव्ह - ९२
उपचार घेऊन घरी परतलेले - ७७
उपचार सुरू -१२
मृत्यू - तीन
...
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.