चिमणीला आले ‘अच्छे दिन’...!

file photo
file photo
Updated on

परभणी :  चिऊताई ये... काऊताई ये.. दाना खा... पाणी पी... आणि भुर्रर उडून जा...! या कवितेच्या ओळीतील चिऊताई खरच आपल्या सर्वांच्या आयुष्यातून भुर्रर झाली आहे. याचे कारण वाढते यांत्रिकीकरण म्हणावे लागले. परंतु, आपल्या आंगणात येणाऱ्या या छोट्याशा गोडंस पक्षाला वाचविण्यासाठी सर्वांनी एकत्र होणे गरजेचे आहे. उन्हाळा जवळ आला आहे. आतापासूनच चिऊताईसाठी घराच्या छतावर पाण्याचे भांडे व धान्य ठेवून तिला परत आपल्या आयुष्यात येण्यासाठी मदत करूयात का? 


दरम्यान, नुकताच पंधरा हजारांहून अधिक पक्षीनिरीक्षकांचा अभ्यास एकत्रित करून भारतातील पक्ष्यांचा सद्यःस्थिती अहवाल २०२० सादर करण्यात आला. या अहवालात निरीक्षकांनी ‘चिमणी’चे अच्छे दिन आले हे स्पष्ट केलं; पण चिमणीचे अच्छे दिन हे ग्रामीण भागात आले. मात्र, शहरी भागात चिमण्यांची संख्या अतिप्रमाणात घटत चालल्याची माहिती या अहवालात सांगितली. शहरी भागापेक्षा निमशहरी भागात चिमण्यांची संख्या स्थिर आहे. एकूणच ग्रामीण आणि निमशहरी भागात चिमण्या सुखाने नांदत आहेत, हे सिद्ध केले.


चिमणी....! आपल्या अंगणात खेळणारा... बागडणारा एक सुंदर पक्षी. परंतु, प्रगतीच्या नादात होणाऱ्या बदलामुळे या पक्षाचे अस्तित्वच नष्ट होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे तिच्या संवर्धनासाठी ता. २० मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा केला जातो.

असा आहे इतिहास...
१९६० च्या दशकात चीनचे तत्कालीन पंतप्रधान माओत्से तुंग यांनी एक चिमणी एका दिवसात ५० ग्रॅम धान्य खाते अशा हिशोब केला. चिमणीचा शेतीच्या नुकसानात खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे, असे सांगून चिमण्या मारण्याचा आदेश दिला. पंतप्रधानाचा आदेश माणून चिमण्या मारायला सुरवात झाली. बघता बघता रोज लाखोंच्या संख्येत चिमण्या मारल्या जाऊ लागल्या. त्यानंतर एक - दोन वर्षांत सकारात्मक बदल झाला. शेती उत्पादनात वाढ झाली. पण काही काळानंतर शेतीमधल्या कीटकांची संख्या अमाप वाढली. अमाप वाढलेल्या कीटकांची संख्या आता शेतकऱ्यांची उभी पिकं नष्ट करू लागली. अतिजास्त प्रमाणात पिकांच नुकसान होत आहे. हे लक्षात आल्यानंतर त्या वेळी चिमण्या धान्याबरोबरच किटकांचा सफाया करत असत आणि किरकोळ प्रमाणात धान्य खात असत चिमण्यांची कृषी संस्थेतील महत्त्वाची भूमिका त्याच्या लक्षात आली. चीनच्या पंतप्रधानांनी लगेच चिमण्या मारणे बंद करण्याचे आदेश दिले. तेव्हापासून आजतागायत चिमण्यांची संख्या रोडावलेली आहे. तेव्हापासूनच चिमण्या वाचविण्यासाठी २० मार्च हा वर्षातला एक दिवस चिमणीसाठी ठरला.

हेही वाचा व पहा -

आपला स्वार्थच ठरला कारणीभूत
आज मानवी वस्तीत सर्वत्र सिमेंटची घरे मोठया प्रमाणात दिमाखात उभी आहेत. तिला घरटयासाठी थोडीसी जागाही मिळणे कठीण झाले आहे. मोबाइल टॉवरच्या लहरीमुळे शहरी भागातून चिमण्या गायब झाल्या आहेत. हे चित्र बदलण्यासाठी विविध संस्था जगभर आणि भारतात चिमणी संवर्धनाचे काम करत असतात. चिमण्यांच्या संवर्धनासाठी सुरक्षित ठिकाणी घरटे लावून आश्रय द्यावा, अंगणात, छतावर, गॅलरीत पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था करावी. प्रत्येक प्राण्याला जगण्यासाठी व उत्पत्तीसाठी अन्न व सुरक्षित निवाऱ्याची आवश्यकता असते. आपण आपले सिमेंटचे जंगल बांधताना आपल्या स्वार्थापुढे या जिवाकडे आपले लक्ष गेले नाही. बदलत्या जीवनशैलीमुळे व रासायनिक कीटकनाशकांच्या अनियंत्रित वापरामुळे चिमण्यांच्या दोन्ही मूलभूत गरजाच आपण नष्ट करत गेलो आणि करत आहोत.


चिमण्यांच्या सुरक्षसेसाठी प्रयत्न करा
चिमण्या वाचविण्यासाठी आपण प्रयत्न करू. चिमण्यांच्या संवर्धनासाठी सुरक्षित ठिकाणी घरटे लावून आश्रय द्यावा, अंगणात, छतावर, गॅलरीत पिण्यासाठी पाणी व खाण्यासाठी धान्याची व्यवस्था करावी आणि लाकडी पुठ्ठ्याचे घरटे तयार करता येईल. हे घरटे आपल्या घरातील बागेत किंवा गॅलरीत लावल्यास चिमण्यांचा वावर वाढण्यास मदत होईल.
- अनिल उरटवाड, पक्षीमित्र
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com