obc community fasting
sakal
वडीगोद्री (जि. जालना) - मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये, हैदराबाद गॅझेटियरबाबतचा ‘जीआर’ रद्द करावा, शिंदे समितीला मुदतवाढ देऊ नये, ओबीसी उपसमितीने उपोषणस्थळी भेट द्यावी आदी मागण्यांसाठी सोनियानगर-अंतरवाली सराटी (ता. अंबड) येथे सलग चौथ्या दिवशी, गुरुवारीही उपोषण सुरू होते. हैदराबाद गॅझिटिअरबाबतचा जीआर रद्द होईपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्धार त्यांनी केला आहे.