पावसाअभावी पिकांची वाढ खुंटली 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 23 ऑगस्ट 2019

रहिमाबाद,  (जि. औरंगाबाद)   : रहिमाबाद (ता. सिल्लोड) परिसरात दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्यामुळे खरीप पिके वाया जाण्याची भीती निर्माण झाली असून, शेतकरी दमदार पावसाच्या प्रतीक्षेत आहेत. यंदा पावसाने काही ठिकाणी दमदार हजेरी लावली, तर काही भागात रिमझिम पावसावर पिके बहरली आहेत.

सिल्लोड महसूल मंडळात सरासरीएवढाही पाऊस नसल्याने खेळणा मध्यम प्रकल्प वगळता इतर पाझर तलाव व रहिमाबाद लघुसिंचन प्रकल्पात केवळ 30 ते 35 टक्केच पाणीसाठा आहे.  विहिरींमध्येही जेमतेम पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यातही गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारली आहे. दाणे भरण्याच्या स्थितीत असलेली मका, उडीद, मूग, चवळी, सोयाबीन आदी पिकांची पावसाअभावी वाढ खुंटली आहे 

कोरडवाहू अल्पभूधारक शेतकऱ्यांना हातातोंडाशी आलेला घास हिरावण्याची भीती वाटत आहे. यंदा पावसाअभावी खरिपाची पेरणी पंधरा दिवस उशिराने झाली. पेरणीच्या सुमारास पावसाने दमदार हजेरी लावल्याने दरवर्षीपेक्षा पिके जोमात बहरली; मात्र गेल्या दहा ते पंधरा दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने ही पिके संकटात सापडली आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: obstacles in crop growing due to less rain