March End : मार्च एंडमुळे लेखाजोखा पूर्ण करण्यासाठी व निधी खर्च करण्यासाठी शनिवारचा सुटीचा दिवसही कार्यालये गजबजलेली होती. आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी प्रशासनाने कार्य पूर्णता साधली.
बीड : आर्थिक वर्षाचा अखेर अर्थात मार्च एंडमुळे सर्व लेखाजोखा पूर्ण करुन आलेला निधी खर्च करणे आणि इतर अनुषंगिक कामे करण्यासाठी शनिवारी (ता. २९) आठवडी सुटीचा दिवस असूनही बहुतांशी कार्यालये गजबजलेली होती.