कोरोना मुक्ती साठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहावे

ashok chavan photo.jpg
ashok chavan photo.jpg

नांदेड : कोरोना मुक्त नांदेड जिल्हा व कोरोना विषाणुचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून सोपविण्यात आलेली कामे जबाबदारीने पूर्ण करावीत, असे निर्देश राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी  दिले.  

जिल्हाधिकारी कार्यालयात घेतला आढावा
कोरोनाच्या पार्श्वभुमीवर पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मंगळवारी (ता. १४) जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेतली, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन, अतिरिक्त जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांची प्रमुख उपस्थिती होती.

अत्यावश्यक सेवेची कामे वेळेत व्हावी 
पालकमंत्री अशोक चव्हाण म्हणाले, जिल्हा सिमेवर बिलोली तालुक्यात प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे सुविधा युक्त चेक पोस्ट उभारण्यात आलेला आहे. याचा उपयोग कोव्हीड १९ च्या अनुषंगाने आरोग्य तपासणीसह इतर अत्यावश्यक सुविधांसाठी उपयोगात आणता येईल. कोरोना संसर्गाविषयी आवश्यक ती काळजी घेऊन पावसाळ्यापूर्वी करावयाची अत्यावश्यक सेवेतील दुरुस्तीची कामे शासनाच्या निर्देशानुसार वेळेत पूर्ण करावी.

हेही वाचलेच पाहिजे....दिव्यांग युवकाकडून लाखमोलाची मदत
 
वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा मुळ ठिकाणी घ्यावी
कोव्हीड १९ पार्श्वभुमीवर वैद्यकीय उपचारासाठी सेवावर्ग वैद्यकीय अधिकाऱ्यांची सेवा मुळ ठिकाणी घ्यावी. जिल्ह्यातील अधिकारी, कर्मचाऱ्यांनी मुख्यालय राहणे बंधनकारक राहील. वैद्यकीय सुविधा देण्यासाठी साधनसामुग्री, मनुष्यबळासह रुग्णालय अद्यावत ठेवावीत, आदी सुचना पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी दिल्या. 

अडकलेल्या नागरिकांची व्यवस्था
लॉकडाऊन काळात बाहेर जिल्ह्यातून आलेल्या नागरिकांना परत त्यांच्या घरी जाण्यासाठी तसेच जिल्ह्यातील बाहेर जिल्ह्यात अडकेलेल्या नागरिकांना परत नांदेड येथे त्यांच्या घरी आणण्यासाठी करावयाच्या व्यवस्थेची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्री सहाय्यता निधी कोविड १९ साठी ॲड सुरेंद्र घोडजकर यांनी २० हजार रुपये तर महेश मगर यांनी ११ हजार रुपयांचा धनादेश पालकमंत्री अशोक चव्हाण यांच्याकडे सुपूर्द केला.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन
भारतीय संविधानाचे शिल्पकार प्रज्ञासूर्य भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती निमित्त राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयात डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

अधिकारी - कर्मचारी उपस्थिती
यावेळी आमदार अमर राजूरकर, आमदार मोहन हंबर्डे, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, अप्पर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, उपजिल्हाधिकारी संतोषी देवकूळे, तहसिलदार संजय बिराजदार, जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी डॉ. बाबासाहेबांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करुन वंदन केले.

कोरोनाच्या पार्श्वभुमी दक्षता
कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने नागरिकांना कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर घरीच थांबून डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्याचे आवाहन केले होते. मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात कोरोनाच्या अनुषंगाने सुरक्षिततेची काळजी घेऊन हा अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com