
धाराशिव : खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर यांनी शनिवारी संसदेचे अधिवेशन संपताच मस्साजोग येथे मयत सरपंच संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांची भेट घेतली. मस्साजोग (ता. केज, जि. बीड) येथील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचे पडसाद महाराष्ट्राच्या विधानमंडळासह सर्वत्र उमटले आहेत.