रमजान ईदनिमित्ताने हिंगोली बाजारात खरेदीसाठी उडाली झुंबड | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हिंगोली बाजार फुलला

रमजान ईदनिमित्ताने हिंगोली बाजारात खरेदीसाठी उडाली झुंबड

हिंगोली : मुस्लिम धर्मीयांचा पवित्र रमजान (ramjan month) महिन्याचा समारोप ईद सणाने होतो हा सण दोन दिवसावर आल्याने तसेच दिवसाआड बाजारपेठ (Hingoli market open ) सुरु राहत असल्याने बुधवार ( ता. ११ ) बाजारात विविध वस्तू खरेदी करण्यासाठी झुंबड उडाली होती. (On the occasion of Ramadan, there is a rush for shopping in Hingoli Bazaar)

रमजान ईद जवळ आल्याने त्यासाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदीसाठी बाजारात नागरिकांनी गर्दी केली होती. शहरात लाँकडाऊन सुरु असून दिवसाआड सकाळी सात ते अकरा यावेळी बाजारपेठ उघडण्यास मुभा आहे. बुधवारी सकाळपासून बाजारात गर्दी झाली होती. यात ईद निमित्ताने शिरखुर्मा तयार करण्यासाठी लागणारा सुकामेवा याला मागणी होती. बाजारात गांधी चौक, जवाहर रोड, सदर बाजार, मेहराज उल्लुम मशीद परिसर, हरण चौक, आदी ठिकाणी सुकामेवा विक्रीसाठी उपलब्ध झाला होता.

हेही वाचा - एअर इंडियाचे नांदेड- अमृतसर- दिल्ली विमानसेवा पुन्हा लॅन्ड; मात्र जुन महिन्याची बुकिंग सुरु

दरवर्षी मात्र रमजान महिण्यात महिणाभर दुकाने सुरु असतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर खरेदी होते. यावर्षी मात्र लाँकडाऊनचा फटका सुकामेवा विक्रेत्यांना बसला आहे. तसेच कपडा मार्केट बंद असल्याने हे व्यावसायीक देखील मोठ्या अडचणीत सापडले आहेत. शहरात विक्रीस आलेल्या सुकामेव्यात काजु, सहाशे पन्नास ते सातशे रुपये किलो, बदाम सहाशे ते ६५०, चारोळी एक हजार ते अकराशे रुपये किलो, शेवया साठ ते ऐंशी, खजूर दोनशे रुपये किलो, खिसमिस दोनशे ४० ते ५० रुपये किलो, खोबरे दोनशे दहा ते विस रुपये किलो, अजीर एक हजार ते बाराशे रुपये किलोप्रमाणे विक्री होत असल्याचे विक्रेते सांगत आहेत. यासह ईदनिमित्ताने लागणाऱ्या वस्तू खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली होती.

संपादन- प्रल्हाद कांबळे

Web Title: On The Occasion Of Ramadan There Is A Rush For Shopping In Hingoli

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top