खाऊच्या आमिष दाखवून चिमुकलीला नेले, अन नराधमाने.... 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
Friday, 20 December 2019

उदगीर शहरातील निडेबन वेस भागातील आपल्या घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या एका सात वर्षीय दलित बालिकेस बुधवारी (ता.18) सायंकाळी सव्वा चार ते साडे सातच्या दरम्यान दबीपुरा येथील नवाज सत्तार शेख या नराधमाने तुला खाऊ देतो म्हणून उचलून नेऊन पलिकडील एका मोकळ्या लैंगिक अत्याचार केला.

उदगीर (जि. लातूर) : शहरातील निडेबन वेस भागात राहणाऱ्या एका सात वर्षांय अल्पवयीन चिमुकलीला खाऊचे आमिष दाखवून मोकळ्या मैदानात नेत एका नराधमाने लैगिंक अत्याचार केला. ही घटना बुधवारी (ता.18) घडली आहे. गुरूवारी (ता.19) रात्री उशिरा शहर पोलीस ठाण्यात बाल लैंगिक अत्याचार कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवाज सत्तार शेख (रा. दबीपूरा, उदगीर, जि. लातूर) असे त्या आरोपीचे नाव आहे. 

हेही वाचा- (व्हिडीओ पाहा) जालना जिल्ह्यात तब्बल 400 किलो गांजा जप्त;ओडिसा राज्यातून होतेय...

याबाबत शहर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार उदगीर शहरातील निडेबन वेस भागातील आपल्या घरासमोरील रस्त्यावर खेळत असलेल्या एका सात वर्षीय दलित बालिकेस बुधवारी (ता.18) सायंकाळी सव्वा चार ते साडे सातच्या दरम्यान दबीपुरा येथील नवाज सत्तार शेख या नराधमाने तुला खाऊ देतो म्हणून उचलून नेऊन पलिकडील एका मोकळ्या लैंगिक अत्याचार केला. मुलीने आरडाओरड केल्याचा आवाज परिसरातील काही नागरिकांनी ऐकून त्यांनी तेथे जाऊन बघितले असता तेथे लैंगिक अत्याचार सुरू असल्याचे त्याच्या लक्षात आले.तात्काळ या मुलीची सुटका करून काही नागरिकांनी तिला तिच्या घरी नेऊन सोडले. या ठिकाणी लोक आले असता हा नाराधम तिथून पळून गेला. वडील बाहेरगावी गेल्याने आई, आजी यानी रात्रभर या मुलीची काळजी घेऊन मुलीच्या वडिलांची वाट पाहिली. 

हे वाचलंत का?- ...तर झाडे तोडणाऱ्यांना बाळासाहेबांनी फटके दिले असते! - शरद पवार

सायंकाळी गुन्हा दाखल 
गुरुवारी (ता.19) पीडित बालिकेचे वडील घरी आल्यानंतर घडला प्रकार त्यांना कळाला. त्यानंतर सायंकाळी त्यांनी शहर पोलीस ठाणे गाठून घडलेली हकीकत शहर पोलीस निरीक्षक महेश शर्मा यांना सांगितले. त्यांनी तात्काळ आरोपीला पकडून आणले. रात्री उशिरापर्यंत चौकशी करून बाललैंगिक अत्याचार कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीस अटक केली.उपविभागीय पोलिस अधिकारी मधुकर जवळकर तपास करत आहेत. 

उघडून तर पहा-बोक्याने फोडली हॉटेलची काच; पोलिसांनी केली अटक 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One Accussed in Rape case Minor Age Girl