येरमाळयात पकडला दीड टन बनावट खवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

One and a half ton fake Khava seized in Yermalaya

येरमाळयात पकडला दीड टन बनावट खवा

येरमाळा - बनावट खव्याचे सत्र कांही थांबण्यास तयार नसुन गुरुवारी पहाटे बनावट खव्याच्या गाडीचा वाहतुक पोलिसांनी पाठलाग करुन ताब्यात घेतली. या गाडीतील दीड टन बनावट खवा अन्नऔषध प्रशासनाने नष्ठ करायचे सोडुन त्याचे नमुने घेऊन शितगृहात ठेवल्याने अन्नऔषध प्रशासनच बनावट खवा व्यवसायाला प्रोत्साहन देते की काय, असा सवाल उपस्थित होत आहे.

या बाबत वाहतुक पोलीस शाखेकडून मिळाली माहिती अशी की, गुरुवार (ता. २८) रोजी येडशी टोल नाक्या वरुन तपासणी दरम्यान एम.एच. २६ ए.के. २५३५ बोलेरो चालकांनी पळवून नेल्याने पोलिसांनी संशय आल्याने महामार्गावर व्हॅन घेऊन मलकापूर शिवारात हजर असलेले सपोनि बाळासाहेब शिंदे यांना माहिती देऊन सदर गाडी दुधाळवाडी पाटीवर पाठलाग करुन शिंदे यांनी पकडून येरमाळा पोलिसांच्या ताब्यात दिली.

खवा बनावट असल्याने अन्नऔषध प्रशासनाला पाचारण करण्यात आले. याची चर्चा दिवसभर येरमाळा परिसरातील खवा व्यापाऱ्यात रंगली होती. यातुन बनावट खवाच्या मोठया टोळीचा पर्दाफाश होईल. कोल्हापूर, सांगली, मिरज भागतुन अशा प्रकारे बनावट खव्याची वाहतूक मोठया प्रमाणात होत असून बीड, उस्मानाबाद, येरमाळा, सरमकुंडी येथील कांही व्यापारी रोजच्या चांगल्या खव्यासोबत पाच सहा टन बनावट खव्याची विक्री करतात, बनावट खवा पकडण्याचे अनेक प्रकार गेल्या दोन वर्षांपासून घडले असुन सततच्या पकडा पकडीच्या खेळात अन्नऔषध प्रशासन विभागाचे या टोळीशी लागे बांधे जुळले असुन यांच्या कडुन दर महिन्याला अन्नऔषध गाड्या येऊन चिरी मिरी घेऊन जातात असे कांही अस्सल खवा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांचे म्हणणे आहे.त्यामुळे खवय्येगिरांचे आरोग्य धोक्यात आले असुन बनावट खव्याचा गोरख धंदा असाच सुरुच राहिला तर परिणामी चांगला खवा विक्रेत्यांवर व दुधव्यवसाय अडचणीत येणार असे दिसते.

या घटनेत येरमाळा पोलीस स्टेशन यांच्याकडून प्राप्त माहितीच्या अनुषंगाने अन्न व औषध प्रशासन उस्मााबादचे सहायक आयुक्त (अन्न) श्री.शि.बा.कोडगिरे,अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती न.त.मुजावर, नमुना सहायक श्री.तुकाराम अकुसकर यांच्या समवेत येरमाळा पोलीस स्टेशन येथे भेट देऊन तेथे चालक अक्षय सानप या व्यक्तीकडून व त्याचे वाहन क्र.एम.एच.२६ ए.के. २५३५ यामधून नामे राजू पाटील रा.सौंदत्ती कर्नाटक तसेच महेश चौगुले रा.चंदुर कर्नाटक यांच्याकडून कर्नाटक मधून आणलेला सुमारे १४९८ किलो खवा ज्याची अंदाजे किंमत रुपये २,९९६०० इतका जप्त करुन रांजणी येथे कोल्ड स्टोरेज मध्ये अहवाल प्राप्त येईपर्यंत ठेवण्यात आला आहे.सदर अहवाल प्राप्त झाल्यानंतर त्या अनुषंगाने पुढील योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तो पर्यंत सदर वाहन आणि हजार व्यक्ती म्हणजेच अक्षय सानप याला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.कोडगिरे यांनी सकाळशी बोलताना सांगितले.

Web Title: One And A Half Ton Fake Khava Seized In Yermala

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..