अंबाजोगाई तालुक्यात बसखाली चिरडून एक ठार

अशोक कोळी
शनिवार, 6 जुलै 2019

शनिवार सकाळी अंबाजोगाई ते आपेगाव बस गावात आली. चालक नवीन असल्यामुळे बस आपेगाव रस्ता सोडून धानोरा गावात वळविण्यात आली. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी ही गोष्ट चालकाच्या लक्षात आणून दिली.

धानोरा (ता. अंबाजोगाई) : बस वळविताना बस आणि चौकाच्या भिंतीत चेंगरुन एकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी (ता. सहा) धानोरा खुर्द (ता. अंबाजोगाई) येथे घडली. दगडू शितोळे (वय ५५ रा. तटबोरगाव, ता. अंबाजोगाई) असे अपघातात मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.

शनिवार सकाळी अंबाजोगाई ते आपेगाव बस गावात आली. चालक नवीन असल्यामुळे बस आपेगाव रस्ता सोडून धानोरा गावात वळविण्यात आली. रस्ता चुकल्याचे लक्षात आल्याने प्रवाशांनी ही गोष्ट चालकाच्या लक्षात आणून दिली. त्यामुळे परत वळण्यासाठी बस मागे घेताना बस मागे घेऊन अंबाजोगाईला जाण्यासाठी चौकात उभे असलेले दगडू शितोळे हे चौकाची भिंत आणी बस यांच्या मध्ये चेंगरले. गंभीर जखमी झालेल्या दगडू शितोळे यांना अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मयत घोषित केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: one dead in accident ambajogai

टॅग्स