औरंगाबाद: ट्रक-मोटारसायकलीच्या धडकेत दुचाकीस्वार ठार 

बाबासाहेब दांडगे
शनिवार, 22 सप्टेंबर 2018

मृताचे नाव रोहित इंदलसिंग काकरवाल ( वय 22), तर जखमीचे आकाश रमेश हारदे (वय 23 दोघेही रा. गल्लेबोरगाव, ता.खुलताबाद) असे आहे. आकाशला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे.

गल्लेबोरगाव : औरंगाबाद-कन्नड महामार्गावर आलापूर फाटा (ता. खुलताबाद) येथे शुक्रवारी (ता. २१) रात्री उशीरा कन्नडहून औरंगाबादकडे येणारा ट्रक (एमएच. २४ एबी ६९५९) आणि मोटारसायकलीचा (एमएच २० ईवी ५६८६) भीषण अपघात झाला. यात दुचाकीस्वार ठार, तर एक जण गंभीर जखमी झाला.

मृताचे नाव रोहित इंदलसिंग काकरवाल ( वय 22), तर जखमीचे आकाश रमेश हारदे (वय 23 दोघेही रा. गल्लेबोरगाव, ता.खुलताबाद) असे आहे. आकाशला पुढील उपचारासाठी औरंगाबाद येथे हलविण्यात आले आहे. हे दोघे गल्लेबोरगावहून मोटारसायकलवरून कन्नडला जात होते.हा अपघात महामार्ग पोलिस मदत केंद्राजवळच झाला.

अपघाताचा आवाज होताच महामार्ग पोलिस मदत केंद्राचे सहायक पोलिस निरीक्षक नामदेव चव्हाण, पोलिस हेडकाॅन्सटेबल बाळनाथ मोरे, संजय धोटे, भगवान पवार, अजहर खान, शरद दळवी, शांताराम सोनवणे यांनी मदत करत महामार्गावरील वाहतुक सुरळीत केली.

Web Title: one dead in accident near Aurangabad