esakal | अंबाजोगाईत गणेश मिरवणूकीत एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू
sakal

बोलून बातमी शोधा

one dies in ganpati procession due to heart attack in ambajogai

अंबाजोगाईत गणेश मिरवणूकीत एकाचा हृदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

sakal_logo
By
प्रशांत बर्दापूरकर

अंबाजोगाई : शहरातील पटाईतगल्ली रविवार पेठ भागात सोमवारी (ता. 2) गणेश स्थापनेच्या मिरवणुकीत नाचताना युवकाला अचानक चक्कर आली. त्याला उपचारासाठी दाखल केले असता उपचार सुरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. श्याम महादेव गोंडे (वय 36) असे या युवकाचे नाव आहे. 

घटनेची माहिती अशी, की सोमवारी सायंकाळी पटाईतगल्ली (रविवार पेठ) भागातील गणपती स्थापन करण्यासाठी वाजत गाजत मिरवणुकीने येत होते. त्यात श्याम गोंडे सहभागी झाले होते. यावेळी त्यांना अचानक चक्कर आली.

सोबतच्या मित्रांनी त्यांना स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयात दाखल केले असता उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे हळहळ व्यक्त होत आहे. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, दोन भाऊ, आई वडील असा परिवार आहे. 
 

loading image
go to top