esakal | परभणीत रविवारी एकाचा मृत्यू, ६२ पॉझिटिव्ह...
sakal

बोलून बातमी शोधा

file photo

परभणी जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) उपचारादरम्यान एकाचा मत्यू झाला तर नव्याने ६२ पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली.

परभणीत रविवारी एकाचा मृत्यू, ६२ पॉझिटिव्ह...

sakal_logo
By
गणेश पांडे

परभणी ः जिल्ह्यात रविवारी (ता.सहा) उपचारादरम्यान एकाचा मत्यू झाला तर नव्याने ६२ पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. बाळासाहेब नागरगोजे यांनी दिली. जिल्ह्यातील एकूण मृतांची संख्या १३५ झाली आहे. मृतांमध्ये पुर्णा शहरातील एका ५५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. एकूण बाधित रुग्णांची संख्या तीन हजार १३३ तर एक हजार ८२५ रुग्ण बरे झाले आहेत. सध्या एक हजार १७३ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

गर्भवतींसह ५० वर्षांवरील नागरिकांच्या आजपासून रॅपिड टेस्ट
परभणी महापालिकेच्या वतीने सोमवारपासून (ता.सात) शहरातील गर्भवती व विविध आजार असलेल्या ५० वर्षांवरील व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. सर्वाधिक रुग्ण आढळून आलेल्या शहरातील चार प्रभागांना प्राधान्य देण्यात आले असून, पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आल्यास त्याच्यासह त्याच्या कुटुंबीयांना व्यवस्था असेल, तर घरीच विलगीकरणाची संधी देण्यात येणार आहे.

रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करून घेणे आवश्यक
महापालिकेने कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शहरातील सर्व व्यापारी, भाजीपाला, दूध विक्रेते, किराणा व्यावसायिक यांच्यासाठी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट कॅंप घेतले; परंतु आता त्यास प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता गृहीत धरून पालिकेने आता शहरातील गर्भवतींसह ५० वर्षापेक्षा जास्त वयाचे व ज्यांना कर्करोग, तीव्र दमा, श्वसनविकार, मधुमेह, उच्च रक्तदाब, हृदयविकार, मूत्रपिंड विकार आदी रोगांपैकी एखादा गंभीर आजार व गंभीर वैद्यकीय परिस्थिती असल्यास त्यांनी रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट करून घेणे आवश्यक असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

हेही वाचाशालेय पुस्तके विक्रेत्यांचा व्यवसाय बुडाला, काय आहे कारण? ​

घरीच होणार रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट
महापालिकेने शहरातील नागरिकांची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट घेण्यासाठी रुग्णवाहिका व वैद्यकीय पथकांची व्यवस्था केली आहे. संबंधित पथक शहरातील सर्व प्रभागांत फिरून तेथेच ५० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या व्यक्तींची रॅपिड ॲन्टीजेन टेस्ट केली जाणार आहे. ज्यांची टेस्ट पॉझिटिव्ह आली, त्या रुग्णांना आवश्यक सोयी-सुविधा असल्यास घरीच विलगीकरणाची संधी दिली जाणार आहे. तसेच घरातील व्यक्तींना देखील सुविधा असतील, तर घरातच क्वारंटाइनची (अलगीकरण) संधी दिली जाणार असल्याचे पालिकेने म्हटले आहे.

येथे क्लिक करासस्पेन्स, ड्रामा, ॲक्शनचा गोड शेवट लग्नबेडीत

चार प्रभागांना प्राधान्य
सद्यःस्थितीत शहरात ज्या प्रभागात जास्त कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले त्या प्रभाग चार, पाच, नऊ व १५ या प्रभागांतील ५० वर्षांवरील नागरिकांची रॅपिड टेस्ट केली जाणार आहे. त्यानंतर टप्प्याटप्प्याने सर्व प्रभागांत टेस्ट केल्या जाणार आहेत. नागरिकांनी कोरोनाला आळा घालण्यासाठी टेस्ट करून घ्याव्यात, असे आवाहन महापौर अनिता सोनकांबळे, आयुक्त देविदास पवार, उपमहापौर भगवान वाघमारे, सभागृह नेते सय्यद समी ऊर्फ माजुलाला, विरोधी पक्षनेते विजय जामकर, स्थायी समिती सभापती गुलमीर खान यांनी केले आहे.

परभणी जिल्हा
एकूण बाधित - तीन हजार १३३
आजचे बाधित - ६२
आजचे मृत्यु - एक
एकूण बरे - एक हजार ८२५
उपचार सुरु असलेले - एक हजार १७३
एकूण मृत्यु - १३५

संपादन ः राजन मंगरुळकर