esakal | वीस गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम
sakal

बोलून बातमी शोधा

वीस गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम

यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असून, त्यात शहरातील मानाच्या, मिरवणुकीच्या मंडळांची संख्या सात आहे. दरम्यान, वीस गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्यात येत आहे,'' अशी माहिती पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी मंगळवारी (ता. तीन) दिली.

वीस गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पैठण (जि.औरंगाबाद) : यंदाच्या गणेशोत्सवात एकूण 112 सार्वजनिक गणेश मंडळांनी श्रीगणेशाची स्थापना केली असून, त्यात शहरातील मानाच्या, मिरवणुकीच्या मंडळांची संख्या सात आहे. दरम्यान, वीस गावांत "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्यात येत आहे,'' अशी माहिती पोलिस निरीक्षक भगीरथ देशमुख यांनी मंगळवारी (ता. तीन) दिली.


यंदा गणेश मंडळांनी विविध सामाजिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रमांचे अयोजन केले आहे. विसर्जनाच्या दिवशी मानाचे, मिरवणुकीचे गणेश मंडळांतील पदाधिकारी, कार्यकर्ते शहरातून मिरवणूक काढतात. या मंडळांनी विसर्जनासाठी सादर करण्यात येणाऱ्या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीला सुरवात केली आहे. शहरात 61, तर ग्रामीण भागात 59 मंडळांची संख्या आहे. या सर्व मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सव शांततेत साजरा करण्याचे आवाहन पोलिस प्रशासनाने केले आहे; तसेच दैनंदिन कायदा व सुव्यवस्थेच्या सूचनांचे पालन करण्याची माहितीही देण्यात आली आहे.

दरम्यान, आमच्या गावातील सर्व नागरिकांनी पुढाकार घेऊन सामाजिक एकोपा निर्माण व्हावा, यासाठी "एक गाव, एक गणपती' हा उपक्रम राबविण्यात आला असल्याचे दादेगाव जहांगीर येथील मंडळाचे अध्यक्ष रामेश्वर भोसले यांनी सांगितले.
पैठण पोलिस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गावांतील गणेश मंडळांना "एक गाव, एक गणपती' उपक्रम राबविण्याचे आवाहन गावात बैठका घेऊन पोलिसांतर्फे करण्यात आले होते. त्याला वीस गावांतील मंडळांनी प्रतिसाद दिला. त्यानुसार या गावात "एक गावस एक गणपती'ची स्थापना करण्यात आली आहे.
----

loading image
go to top