esakal | दोन ट्रकच्या धडकेत एक जागीच ठार
sakal

बोलून बातमी शोधा

File photo

दोघे गंभीर जखमी, येळीजवळील घटना 

दोन ट्रकच्या धडकेत एक जागीच ठार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

उमरगा (जि.उस्मानाबाद) : दोन ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला; तर दोघे गंभीर जखमी झाले. ही घटना बुधवारी (ता. चार) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील येळीजवळ (ता. उमरगा) घडली. 


राष्ट्रीय महामार्गावरील येळीजवळ बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सोलापूरहून-हैदराबादकडे जाणारा ट्रक (एनएल- 01, एएल- 5816) व हैदराबादहून पुण्याकडे निघालेला ट्रक (जीजे- 06, एयू- 5094) या दोन वाहनांची समोरासमोर जोराची धडक झाली. या अपघातात एकाचा जागीच मृत्यू झाला, तर दोनजण गंभीर जखमी झाले. या भीषण अपघातात दिलीप कुलाल (वय 30, रा. रावणगाव, ता. उदगीर) यांचा जागीच मृत्यू झाला. तर प्रकाश हरिबा कांबळे (35, रा. रावणगाव, ता. उदगीर) व बळीराम बाजीराव जगताप (40, रा. बेडगा, ता. निलंगा, जि. लातूर) हे दोघे गंभीर जखमी झाले.

जखमींना नरेंद्राचार्य संस्थेच्या रुग्णवाहिकेतून येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. 

loading image
go to top