अपघातात वडवणी तालुक्यात एक ठार; एक जखमी 

मच्छिंद्र मोरे
शुक्रवार, 11 मे 2018

कुप्पा फाट्यावरील वळणावर त्यांच्या दुचाकीला (एम. एच. २२ के. ३१५४) वडवणी कडून तेलगाव कडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एम. एच. ४८ एस. २०३३) समोरुन जोराची धडक दिली.

वडवणी - वळणावर कार चालकाचा ताबा सुटल्याने दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात एक जण ठार तर एक जखमी झाल्याची घटना कुप्पा (ता. वडवणी) येथे शुक्रवारी (ता. ११) दुपारी घडली. दत्ता बालासाहेब शिंदे (वय ४०, रा. वडी, ता. पाथरी, जि. परभणी) असे मयताचे नाव आहे. 

वडी (ता. पाथरी, जि. परभणी) येथील दत्ता शिंदे व त्यांच्या पत्नी विद्या शिंदे (वय 35) हे दाम्पत्य शुक्रवारी या नातेवाईकाच्या लग्नसमारंभासाठी उपळी (ता. वडवणी) येथे दुचाकीवरुन जात होते. कुप्पा फाट्यावरील वळणावर त्यांच्या दुचाकीला (एम. एच. २२ के. ३१५४) वडवणी कडून तेलगाव कडे जाणाऱ्या स्विफ्ट कारने (एम. एच. ४८ एस. २०३३) समोरुन जोराची धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील दत्ता शिंदे हे जागीच ठार झाले. तर, त्यांच्या पत्नी विद्या शिंदे या गंभीर जखमी झाल्या असून त्यांना उपचारासाठी बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले. दरम्यान अपघातात ठार झालेले दत्ता शिंदे वडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच आहेत.

आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Web Title: One killed and one injured in accident at vadavani taluka

टॅग्स