स्कॉर्पिओ जीपखाली चिरडून बीड जिल्ह्यात एक जण ठार

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 July 2020

पनवेल येथून हाडोंग्री (ता. भूम) येथील रहिवासी, एसटी महामंडळाचे बसचालक अभिजित सुखदेव वाघमारे (वय २७) हे आपल्या गावाकडे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास निघाले होते.

कडा (जि. बीड) - आष्टी तालुक्यातील कडा (महेश) सहकारी साखर कारखाना येथे नगर-बीड मार्गावरील स्कॉर्पिओखाली दुचाकी शिरून दुचाकीस्वार ठार झाल्याची घटना शुक्रवारी (ता. तीन)  दुपारी तीनच्या सुमारास घडली. पनवेल येथून हाडोंग्री (ता. भूम) येथील रहिवासी, एसटी महामंडळाचे बसचालक अभिजित सुखदेव वाघमारे (वय २७) हे आपल्या गावाकडे शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास निघाले होते.

महेश सहकारी साखर कारखाना येथे त्यांची दुचाकी (एमएच ४६ एम ५१६५) व स्कॉर्पिओ जीपची (एमएच-१६  बीएच-४४४४) समोरासमोर धडक झाली. अपघातात दुचाकी स्कॉर्पिओखाली आल्याने अभिजित वाघमारे यांच्या डोक्याला व मानेला जबर मार लागल्याने जागीच मृत्यू झाला. याबाबत आष्टी पोलीस ठाण्यात स्कॉर्पिओ चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस नाईक बी. एस. गर्जे हे करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One killed in Beed district