परभणीत पैशांवरून एकाचा चाकूने खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

crime

परभणीत पैशांवरून एकाचा चाकूने खून

परभणी - पैशांच्या देवाण-घेवाणीवरून शहरातील खंडोबा बाजार परिसरातील मराठवाडा शाळेसमोर शनिवारी (ता.३०) रात्री साडेनऊच्या सुमारास एकाचा खून झाला. रफिक शेख चांद शेख ऊर्फ बाबा असे मृताचे नाव आहे. या प्रकरणी नानलपेठ पोलिस ठाण्यात दोघांविरुद्ध गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी एका संशयिताला अटक केली.

प्राप्त माहितीनुसार, शेख हे या परिसरात मित्रासोबत उभे होते. त्यावेळी फिरोज खान अब्दुल खान आणि शेख शाहरुख शेख रशीद हे दोघे तेथे आले. रफिक शेख चांद शेख याच्यासोबत पैशांच्या देवाणघेवाणीवरून झालेल्या वादात फिरोज खान अब्दुल खान याने रफिक शेख चांद शेख याच्या पोटात चाकू मारला; तसेच शेख शाहरुख शेख रशीदने रफिक शेख चांद शेख यास गंभीर जखमी केले. यानंतर गंभीर जखमी असलेल्या रफिक शेख चांद शेख यास त्यांच्या मित्राने व नागरिकांनी जिल्हा रुग्णालय व तेथून खासगी रुग्णालयात हलवले. मात्र, रफिक शेख चांद शेख याचा मृत्यू झाला.

नानलपेठ पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले होते. रहीम खान शरदल खान पठाण (रा.अमीन कॉलनी) यांच्या तक्रारीवरून गुन्हा नोंद झाला असून फिरोज खान अब्दुल खान या संशयितास अटक केली.

Web Title: One Killed By Knife From Money In Parbhani

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Parbhanicrimemurder