बिबट्याच्या हल्लयात एकाचा मृत्यू

सुभाष बिडेघन
गुरुवार, 30 ऑगस्ट 2018

सावंगी : राजेगाव ता. घनसावंगी येथे बिबट्याने केलेल्या हल्लात एका तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना गुरुवार (ता.30) सकाळी आकरा वाजेच्या दरम्यान घडली. राजेगाव ता.घनसावंगी येथील अरुण रमेश आहीरे (वय.23) हा दुसऱ्याच्या शेतात सालगडी म्हणून काम करीत होता.

दररोजच्या कामानुसार सकाळी आकरा वाजता अरुण शेतात काम करण्यासाठी गेला असता बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. सदर घटना पोलिसांना कळविल्यानंतर पोलिस उपनिरीक्षक बोडखे यांनी घटनास्थळी भेट देवुन पंचनामा केला. दरम्यान वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देवुन बिबट्याने हल्ला केला अन्यथा हिस्ञ प्राण्यांने हल्ला केल्याच्या घटनेला दुजारा दिला. त्याच्या पार्थीवावर शवविच्छेदन ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. यावेळी तहसीलदार संजय ढवळे यांनी दवाखान्यात भेट दिली.

Web Title: One killed in leopard attack