esakal | टेम्पो- दुचाकीच्या अपघातात एक ठार: जिंतूर- औंढा मार्गावरील घटना 

बोलून बातमी शोधा

file photo}

विजय उर्फ पप्पू छगनराव जगताप (रा. भोगाव-देवी, ता.जिंतूर) असे मृताचे नाव आहे. अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला.

टेम्पो- दुचाकीच्या अपघातात एक ठार: जिंतूर- औंढा मार्गावरील घटना 
sakal_logo
By
राजाभाऊ नगरकर

जिंतूर (जिल्हा परभणी) : जिंतूर- महामार्गावर टेम्पो व दुचाकीच्या अपघातात २५ वर्षीय दुचाकीस्वार जागीच ठार झाला. हा अपघात गुरुवारी ( ता. चार ) दुपारी बाराच्या सुमारास शहरापासून चार किलोमीटरवर पुंगळा शिवारातील मंदार पेट्रोल पंपासमोर घडला. विजय उर्फ पप्पू छगनराव जगताप (रा. भोगाव-देवी, ता.जिंतूर) असे मृताचे नाव आहे. अपघात होताच टेम्पो चालक फरार झाला.

अपघातग्रस्त तरुण विजय उर्फ पप्पू जगताप हा दुचाकीवरुन (क्र.एमएच-२२, एएस-१९७९) आपल्या गावाकडे भोगाव येथे जात असताना पाठीमागून विटा घेऊन भरधाव येणाऱ्या टेम्पोने ( क्र.एमएच-१५, एजी-७१००) त्याच्या दुचाकीला जोराची धडक दिली. यावेळी दुचाकीस्वार टेम्पोच्या मागील चाकाखाली सापडून त्याच्या अंगावरुन चाक गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान अपघात होताच टेम्पो चालकाने टेम्पो जागेवरच सोडून पळ काढला.

अपघाताची माहिती समजताच महामार्ग केंद्राचे पोलिस उपनिरीक्षक श्री. राठोड, पोलिस कर्मचारी श्री. फुगनर, श्री. जाधव, श्री. डोंबे, श्री. हरसुळकर घटनास्थळी धाव घेऊन जवळपासच्या ग्रामस्थांच्या मदतीने अपघातग्रस्त विजय यास तातडीने जिंतूर येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. तपासणी अंती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यास मृत घोषित केले. दुपारी बातमी लिहिपर्यंत पोलिस ठाण्यात घटनेची  नोंद झाली नव्हती.

संपादन- प्रल्हाद कांबळे