चित्तेपिपंळगाव : धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील (Dhule-Solapur National Highway Accident) निपाणी (ता. छत्रपती संभाजीनगर) शिवारात बीडकडून छत्रपती संभाजीनगरकडे भरधाव वेगाने जाणाऱ्या अज्ञात ट्रकने (Car-Truck Accident) समोर जात असलेल्या कारला पाठीमागून जोराची धडक दिल्याने कार पुलाला धडकून पुलाच्या खाली जाऊन कोसळली. यात कारमधील एका तरूणाचा जागीच मृत्यू झाला, तर दोन जण गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी (ता .१) रात्री दहाच्या सुमारास घडली.