पाथरी ; पंतप्रधान आवास योजनेंतर्गत एक हजार ५७० घरकुल मंजूर 

धनंजय देशपांडे 
Wednesday, 28 October 2020

शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुसऱ्या टप्यात पाथरी शहरासाठी एक हजार ५७० घरकुलांना मंजूरी मिळाली असून यासाठी एकूण १५ कोटी ७० लाखाचा निधी प्राप्त झाला. पहिल्या टप्यातील एक हजार ५५० व दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ५७० अश्या एकूण दोन जार ७२० कुटुंबाना हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी दिली. 

पाथरी ः शहरी भागासाठी प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत दुसऱ्या टप्यात एक हजार ५७० घरकुलांना मंजूरी मिळाली असून यासाठी एकूण १५ कोटी ७० लाखाचा निधी प्राप्त झाला. पहिल्या टप्यातील एक हजार ५५० व दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ५७० अश्या एकूण दोन जार ७२० कुटुंबाना हक्काचे घर मिळणार असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी (ता.२८) रोजी पत्रकार परिषदेत दिली. 

पाथरी शहरात प्रधानमंत्री आवास योजेने अंतर्गत २०१८-१९ व २०१९-२० या साठी ऑनलाइन प्रस्ताव सादर करण्यात आले होते. त्यातील पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांसाठी दोन हजार ७२० घरकुलांना मंजूरी प्राप्त झाली आहे. 

एक हजार ५५० मंजूर घरकुलांचे काम प्रगतीपथावर
सन २०१८ - १९ या वर्षातील पहिल्या टप्यात एक हजार ५५० मंजूर घरकुलांचे काम प्रगतीपथावर आहे. तर दुसऱ्या टप्प्यात २०१९-२० या वर्षात एक हजार ५७० घरकुलांना मंजूरी मिळाली आहे. यासाठी १५ कोटी ७० लाख रुपये निधीस मंजूरी मिळाली असल्याची माहिती आमदार बाबाजानी दुर्राणी यांनी पत्रकार परिषदेत दिली. आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले, प्रधानमंत्री आवास योजने अंतर्गत पहिल्या टप्यातील एक हजार ५५० व दुसऱ्या टप्प्यातील एक हजार ५७० अश्या एकूण दोन हजार ७२० कुटुंबाना हक्काचे घर मिळणार आहे. या वेळी मुख्याधिकारी कारभारी दिवेकर, उपनगराध्यक्ष हन्नान खान दुर्राणी, एजन्सीचे सल्लागार अभियंता जावेद शेख, अॅड.जमिल अन्सारी, सर्व नगरसेवक उपस्थित होते. 

हेही वाचा - कोट्यावधीची उलाढाल यंदा आली लाखावर! परभणीच्या सराफा बाजारातील चित्र

रमाई आवास योजने अंतर्गत ४१५ घरकुल मंजूर 
शहरी भागासाठी रमाई आवास योजनेअंतर्गत २०१८ - १९ मध्ये ३०० घरकुल मंजूर झाले होते ती कामे प्रगतीपथावर असून २०१९-२० या वित्तीय वर्षात ४१५ घरकुलांना मंजुरी मिळाली असून त्याचा निधी अद्याप प्राप्त झालेला नाही. 

हेही वाचा - परभणी : ग्रंथालय कर्मचाऱ्यांची दिवाळी अंधारात

भोगवट धारकांना घरकुल 
शहरातील नगर पालिकेच्या जागेवर राहणाऱ्या लोकांना देण्यात आलेल्या पिटीआर वर भोगवटदार असा उल्लेख असल्याने त्यांना घरकुल योजनेचा लाभ मिळत नाही, अश्या जवळपास सातशे कुटुंबाना घरकुल मिळण्यासाठी प्रयत्न करू. - बाबजानी दुराणी, आमदार. 

 

संपादन ः राजन मंगरुळकर


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: One thousand 570 houses sanctioned under the Prime Minister's Housing Scheme in pathri, Parbhani News