मुस्‍लिम मराठी साहित्य चळवळीचे ऑनलाइन कवी संमेलन

online
online

हिंगोली ः ग्रामीण मुस्‍लिम मराठी साहित्य परिषदेतर्फे शिवराज्यभिषेक दिनाचे औचित्य साधुन रविवारी (ता.सात) ऑनलाइन कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एकापेक्षा एक बहारदार कवीता सादर करून अनेकांनी दाद मिळविली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्‍थानी बुलढाणा येथील प्रसिध्द कवी बी. एफ. खान यांची उपस्‍थिती होती तर साहित्यीक खाजाभाई बागवान यांच्या हस्‍ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून उद्‍घाटन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्‍हणून ॲड. इक्‍बाल रसुलखान यांची उपस्‍थिती होती. कवी संमेलनात अध्यक्षस्थानी स्‍वागतपर कविता गाऊन सादर केली. तर पुणे येथील कवियत्री अनिसा शेख यांनी दैवत छत्रपती ही कविता सादर केली. त्या म्‍हणाल्या, सर्वधर्म समभावाची, किती वर्णावी महती, परस्‍त्रीला मातेसमपुजी, असे थोर दैवत छत्रपती.

विविध विषय मांडले कवितेतून 
सिंधुदुर्ग येथील कवी रघुनाथ राजापुरकर यांनी ‘प्रेमभाव’ ही कविता सादर केली. आता पुन्हा नको ती, ओंजळ सोबतीला वेचने कठीन झाले, प्रेमाच्या पाकळीला. कोल्‍हापूर येथील कवियत्री माणिक नागावे यांनी मृगनक्षत्राच्या प्रांरभीचे वर्णन ‘शिवार’ या कवितेतून सादर केले. ते म्‍हणाले, भेटून गार पावसाळा, नटली हिरवाईने धरती, आपसुकच जागी झाली, मनात तिच्या कोमल प्रिती. अहमदनगर येथील युवा कवी सुयश वाघमारे याने ‘आक्रोश’ या कवितेतून स्‍त्रीयांच्या वेदनेला कवीतेतून मांडण्याचा प्रयत्‍न केला.

विनोदी कवितांनी खळाळले श्रोते
अमरावती येथून कवी दता पेंदारे यांनी भाकरीचे हातावरील महत्‍व पटवून दिले. ते म्‍हणाले, हातावर भाकरी धापताना, माय डोयापुढे दिसे, त्या निखाऱ्यावरील भाकरीचा सुगंग गेला कोठे ही कविता सादर केली. या कवी संमेलनात जाकीर तांबोळी (बार्शी), लक्ष्मण जाधव (सोलापूर), विजय लुल्‍हे (जळगाव), बिभीषण गिरी (उस्‍मानाबाद), अहमद पिरान शेख (वसमत) आदींनी सहभाग घेतला. संमेलनाध्यक्ष बी. एल. खान यांनी विनोदी कविता दारूड्याची शाळा सादर केली. या कवी संमेलनाचे सूत्रसंचालन शेख शफी बोल्‍डेकर यांनी केले तर जाकीर तांबोळी यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com