धानोरा - अंबाजोगाई तालुक्यात सहा खरेदी केंद्रावर आतापर्यंत नोंदणी केलेल्या शेतकऱ्यांपैकी पन्नास टक्के शेतकऱ्यांच्या सोयाबीनची खरेदी झाली असून शासनाकडून सोयाबीन खरेदी करण्यासाठी तीनच दिवस शिल्लक राहिले आहेत. येणाऱ्या तीन दिवसात नोंदणी केलेल्या पन्नास टक्के शेतकऱ्यांची सोयाबीन खरेदी कशी होणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे.