

Police Action, Partial Seizure: Villagers Question Revenue Department’s Inaction
esakal
-राम काळगे
निलंगा : निलंगा तालुक्यातील शिरोळ, कोकळगाव व गिरकचाळ परिसरात नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैध वाळू उपसा करून साठविण्यात आलेल्या वाळूच्या ढिगाऱ्यांबाबत तलाठ्यानी केवळ शिरोळ येथील अर्धवट वाळू जप्त केल्याने महसूल विभागाची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. परिसरात ठिकठिकाणी वाळूचे मोठे साठे दिसून येत असताना संबंधित यंत्रणेने याची जप्ती का केली नाही ? असा सवाल उपस्थित केला जात असून महसूल विभागाच्या कार्यपध्तीवर ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.