Vidhan Sabha 2019 : अशोक चव्हाण यांच्या विरोधात 133 पैकी आता केवळ सहा उमेदवार

संतोष जोशी
सोमवार, 7 ऑक्टोबर 2019

माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या विरोधात 133 पैकी आता केवळ सहा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

नांदेड : अशोक चव्हाण यांचा बालेकिल्ला असलेल्या भोकर विधानसभा मतदार संघात चव्हाणांच्या विरोधात आता केवळ सहा उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात आहेत.

अशोक चव्हाण यांच्या भोकर मतदार संघातून तब्बल 134 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. अशोक चव्हाण यांच्या विरोधात 133 उमेदवारांनी शड्डू ठोकला होता याची राज्यभर चर्चा रंगली होती. परंतु, 43 उमेवारांचे अर्ज बाद झाले आणि 91 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले. उमेदवारी अर्ज वापस घेण्याचा आज शेवटचा दिवस होता. तब्बल 84 उमेदवारांनी उमेदवारी वापस घेतल्याने आता केवळ सात उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत.

अशोक चव्हाण यांची भाजपचे बापूसाहेब गोरठेकर आणि वंचितचे नामदेव आयलवाड यांच्याशी लढत होणार आहे. भोकरची निवडणूक आता एकाच ईव्हीएम मशिनवर होणार असल्याने अशोक चव्हाण यांच्यासह निवडणूक विभागालाही दिलासा मिळाला असल्ययाचे दिसून येत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Only six candidates contest Vidhans sabha election against Ashok Chavan