

‘Operation All Out’ Crackdown: 104 Cases Filed in Just 12 Hours; 129 Accused Booked, Property Worth ₹75.36 Lakh Seized
Sakal
फुलंब्री : आगामी सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील अवैध धंद्यांविरोधात छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांनी ‘ऑपरेशन ऑल आऊट’च्या माध्यमातून धडक मोहीम राबविली. पोलीस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी 6 ते 25 ऑगस्ट रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत अवघ्या 12 तासांत जिल्ह्यातील विविध पोलीस ठाण्यांच्या हद्दीत छापेमारी करण्यात आली. या कारवाईत 129 आरोपींविरुद्ध 104 गुन्हे दाखल करण्यात आले असून 75 लाख 36 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.