राज्यभर गाजलेल्या या घोटाळ्याचा लागलाय निकाल; आरोपीवर तब्बल 175 कोटींचे कर्ज 

​ ​​​सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 डिसेंबर 2019

सदर धान्य घोटाळ्यात आरोपीला 10 मे 2019 रोजी नायगाव तालुक्‍यातील कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. खबऱ्याने पोलिसांना या धान्य घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानुसार, अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील धान्य आरोपीच्या मालकीच्या दुकानात नेण्यात आले. दहा ट्रकांमध्ये 340 पोती गहू आणि तांदळाची होती. हा माल एक कोटी 30 लाख 99 हजारांचा होता. तसेच गोदामात गव्हाची 600 पोती होती. त्याची बाजार किंमत 52 लाख 50 हजार इतकी होती. सदर माल हा स्वस्त धान्य दुकानात गोरगरिबांना वाटप करण्यासाठी जाणार होता; पण त्याचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला. 
 

औरंगाबाद : नांदेड येथील कृष्णूर धान्य घोटाळ्यात आरोपी व इंडिया मेगा ऍग्रो अनाज कंपनीचा मालक अजय बाहेती याला नांदेड येथील न्यायालयात चार कोटी रुपये जमा करण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने दिले. प्रकरणात दोन लाख रुपयांच्या बंधपत्रावर तसेच दोघांच्या हमीपत्रावर अटी व शर्तीसह त्याला न्यायमूर्ती आर. जी. अवचट यांनी जामीन मंजूर केला. 

हेही वाचा- सुरक्षित वॉर्ड शोधू कुठे? आरक्षण सोडतीपूर्वीच इच्छुकांची फिल्डिंग 

चार कोटींपैकी एक कोटी रुपये त्याला दोन आठवड्यांत जमा करायचे आहेत. तर उर्वरित रक्कम दरमहिन्याला 50 लाख रुपये याप्रमाणे जमा करायची आहे. यामध्ये व्यत्यय आल्यास त्याचा दिलेला जामीन रद्द होईल, असे निकालपत्रात स्पष्ट करण्यात आले आहे. सदर धान्य घोटाळ्यात आरोपीला 10 मे 2019 रोजी नायगाव तालुक्‍यातील कुंटूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. खबऱ्याने पोलिसांना या धान्य घोटाळ्याची माहिती दिली होती. त्यानुसार, अन्नधान्य महामंडळाच्या गोदामातील धान्य आरोपीच्या मालकीच्या दुकानात नेण्यात आले. दहा ट्रकांमध्ये 340 पोती गहू आणि तांदळाची होती. हा माल एक कोटी 30 लाख 99 हजारांचा होता. तसेच गोदामात गव्हाची 600 पोती होती. त्याची बाजार किंमत 52 लाख 50 हजार इतकी होती. सदर माल हा स्वस्त धान्य दुकानात गोरगरिबांना वाटप करण्यासाठी जाणार होता; पण त्याचा काळाबाजार पोलिसांनी उघड केला. 

क्लिक करा-सायबर मायाजाल..या टीप्स समजुन घ्या अन्यथा खात्यालाच बसेल कात्री 

आरोपीवर 175 कोटींचे कर्ज 
प्रकरणात अटकेनंतर आरोपीने जामिनासाठी हायकोर्टात धाव घेतली. ज्येष्ठ विधिज्ञ पी. एम. शहा आणि ऍड. अभयसिंह भोसले यांनी आरोपीच्या वतीने युक्तिवाद केला. आरोपीच्या डोक्‍यावर 175 कोटींचे कर्ज आहे. त्याचा धान्य प्रक्रिया उद्योग बंद पडला. त्यामुळे जवळपास एक हजार लोकांचा रोजगार गेला. कर्जवसुलीची प्रक्रिया सुरू झाली आहे. तसेच या प्रकरणात 80 साक्षीदार असून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले आहे. तपास सुरू असला तरी अजून बरेच दिवस तो सुरू राहील, त्यामुळे आरोपीला जामीन देण्याची विनंती करण्यात आली.

हे वाचलंत का?- Video : अभियंत्याच्या टेबलावर टाकले माती व दगड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: An order to raise Rs 4 crore for accused in Krishnur grain scam