esakal | Osmanabad corona updates umarga 4 death by covid 19 traders corona test
sakal

बोलून बातमी शोधा

corona

Corona Updates: उमरग्यात बारा तासांत चार जणांचा मृत्यू

sakal_logo
By
प्रमोद सरवळे

उमरगा (उस्मानाबाद): कोरोना संसर्गाचा विळखा दररोज घट्ट होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. सोमवारी (ता. १३) कोविड रुग्णालयात घेतलेल्या रॅपिड चाचणीत ३३ तर ग्रामीण भागात झालेल्या चाचणीत १६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. दरम्यान बारा तासात चार व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झाल्याने नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन वैद्यकिय तज्ञांकडून केले जात आहे.

उमरगा शहर व तालुक्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जागरूकता महत्वाची ठरत आहे. रविवारी (ता. १२) रॅपिडच्या चाचणीत ४२ व्यक्ती पॉझिटिव्ह आले आहे. पुन्हा सोमवारच्या चाचणीत ४९ पॉझिटिव्ह आले आहेत. रुग्ण संख्या वाढत असल्याने प्रशासनाकडुन प्रतिबंधात्मक उपाययोजनाचे प्रयत्न सुरू असले तरी भल्या मोठया लोकसंख्येच्या तुलनेत अपुरे पडत आहेत, नागरिकानीच स्वतःची काळजी घेणे गरजेचे झाले आहे.

बारा तासात चार व्यक्ती दगावल्या-

संसर्गानंतर उपचार घेऊन बहुतांश लोक कोरोनामूक्त होत आहेत, मात्र त्यांना सोसावे लागणारे दुखणे भलतेच आहे. शारीरिक तंदुरुस्तीपेक्षा रुग्णांना मानसिक धैर्य देणे गरजेचे झाले आहे. रविवारी रात्री आठच्या सुमारास शहरातील शिवाई रुग्णालयात कर्नाटकातील बस्वकल्याणच्या ४० वर्षीय व्यक्तीचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गुंजोटीच्या पन्नास वर्षीय व्यक्तीचा रविवारी रात्री अकरा वाजता मृत्यू झाल तर बाबळसूर येथील ८० वर्षीय वृध्दाचा पहाटे मृत्यु झाला तर सरकारी कोविड रुग्णालयात तालुक्यातील चंडकाळ येथील ६२ वर्षाय पुरुषाचा सोमवारी सकाळी साडेसात वाजता मृत्यू झाला. दरम्यान बारा दिवसात दहा व्यक्तीचा मृत्यू ही बाब चिंतेची असल्याने आता तरी नागरिकांनी स्वतःची काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

कारवाईनंतर रॅपिड चाचणीसाठी व्यापाऱ्यांची गर्दी

शहरात अत्यावश्यक सेवेला प्रशासनाने परवानगी खरी ; पण बऱ्याच व्यापाऱ्यांनी प्रशासनाच्या सूचनेचे पालन न करता कोरोना चाचणी केली नसल्याचे पालिका, पोलिस व महसूलच्या पथकाला निदर्शनास आले, २३ दुकानदारांना दंडात्मक कारवाई केली. सोमवारीही पोलिसांनी कारवाई सुरू ठेवली होती. त्यामुळे व्यापाऱ्यांनी कोविड रुग्णालयात रॅपिड चाचणीसाठी केली होती. १८७ जणांची रॅपिड चाचणी करण्यात आली होती त्यात कांही व्यापारी, औषधी दुकानदारांचा समावेश होता.

" कोरोनाचा संसर्ग वाढतोय, त्यासाठी मानसिक धैर्य महत्वाचे आहे. लक्षणाची जाणीव होताच डॉक्टरांचा सल्ला घेणे महत्वाचे आहे. अंगावर आजार काढणे आजच्या स्थितीत योग्य ठरणार नाही. शरीरातील ऑक्सीजनची लेवल नेहमी तपासावे. दहा मिनीट पायी चालल्यानंतर ऑक्सिजनची लेवल ९४ च्या आत असू नये. - डॉ. विजय बेडदुर्गे, उमरगा

(edited by- pramod sarawale)

loading image