लातूर - तुळजापूर रस्त्यावरील हॉटेलमध्ये गोळीबार; एक जण गंभीर जखमी

osmanabad crime news
osmanabad crime news
Updated on

उस्मानाबाद: जेवणासाठी हॉटेलात आलेल्या टोळक्याने अचानक पिस्तुल काढून फायरिंग केल्याने एकजण गंभीर जखमी झाला आहे. ही घटना भंडारी (ता. उस्मानाबाद) येथील हॉटेल रिलॅक्समध्ये बुधवारी (ता. ३) दुपारी बारा ते एकच्या दरम्यान घडली. जखमीला उपचारासाठी लातूर येथील दवाखान्यात पाठविण्यात आले आहे.

लातूरमार्गे तुळजापूरच्या दिशेने निघालेल्या एका मोटार कार मधील सहा अनोळखी लोक जेवणासाठी हॉटेल रिलॅक्समध्ये आले होते. काही कारणाने त्यातील एकाने अचानक पिस्तुल काढून दोन राउंड फायर केले. त्यातील एक गोळी हॉटेल मालक बाळासाहेब मोरे यांना लागल्याने ते गंभीर जखमी झाले. हे पाहून चिडलेल्या उपस्थित अन्य लोकांनी टोळक्यातील लोकांवर हल्ला केला. टोळक्यातील एकास लोकांनी धरून ठेवले. मारहाण केली. मारहाणीमुळे त्याची शुद्ध हरपली असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याला उपचारासाठी उस्मानाबाद येथील दवाखान्यात पोलिसांनी नेले आहे.

दरम्यान टोळक्यातील सहा पैकी पाच लोक मोटार कारासह फरार आहेत. एकाला अटक करण्यात आली असून त्याची शुद्ध हरपली आहे. दरम्यान पोलिसांना तिथे फायर केलेल्या गोळीची एक पुंगळी मिळाली आहे. असे पोलिस  हेड कॉन्स्टेबल रविकांत जगताप यांनी सांगितले.

(edited by- pramod sarawale)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com