esakal | उस्मानाबाद: 'ई-पीक' पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी
sakal

बोलून बातमी शोधा

उस्मानाबाद: 'ई-पीक' पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

उस्मानाबाद: 'ई-पीक' पाहणी शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी

sakal_logo
By
दिलीप गंभीरे

कळंब: शासनाने सुरू केलेली "ई-पीक पाहणी ही मोहीम शेतकऱ्यासाठी डोकेदुखी ठरत आहे. कोणते पीक कोणत्या रखाण्यात भरावे आणि त्याचे क्षेत्र किती दाखवावे तसेच अॅपवर माहिती सबमिट केल्यास माहिती चुकीची भरली की खरी हे शोधणे कठीण आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची चांगलीच तारांबळ उडत असून, शासनाने सुरू केलेली ई-पीक पाहणी शेतकऱ्यासाठी किचकट असल्याचे शेतकरी सांगत आहेत.

हेही वाचा: परळीत वैद्यनाथ अर्बन बँकचा अधिकारी ताब्यात

राज्य शासनाने १५ ऑगस्टपासून "माझी शेती, माझा सातबारा, मीच नोंदविणार माझा पिक पेरा" ही ई-पीक पाहणी मोहीम राबविण्याचा निर्णय घेतला आहे. पिकासंदर्भातील माहिती अॅपवर कशी भरावी याबाबतची माहिती तलाटी, मंडळाधिकारी, कृषी सहायक यांनी प्रात्यक्षिक स्वरूपात देणे गरजेचे आहे. तालुक्यात ६६ हजार ७४४ शेतकऱ्यांची संख्या असून, बहुतांश शेतकरी शेतात जाऊन 'ऑन द स्पॉट' पीक पाहणी मोहीम राबवित आहेत.

मात्र पीक पाहणी अॅपवर ही माहिती भरताना अनेक तांत्रिक समस्याला तोंड द्यावे लागत असल्याने, ही मोहीम शेतकऱ्यांची डोकेदुखी वाढविणारी ठरत आहे. ऑनलाइन पद्धतीने सातबारा उताऱ्यावर पिकांची नोंदणी करण्याची पद्धत चांगली आहे. पण अनेक अडथळे पार करूनही उपयोग होत नसल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

हेही वाचा: Aurangabad:परिचारिकांच्या बदल्यांना स्थगिती

पहिल्यांदा शेतकऱ्यांना अॅप डाउनलोड करावा लागणार असून अॅपवर जिल्हा, तालुका, गाव निवडल्यानंतर खातेदारांचे नाव लिहावे लागते. सर्व्हर कनेक्ट होत असल्याचा स्क्रीनवर दिसत असून, तात्काळ सर्व्हर कनेक्ट होत नसल्याने तेथून शेतकऱ्यांना अडथळ्यांना सामोरे जावे लागत आहे. ऑन द स्पॉट पिकाची अॅपद्वारे माहिती भरल्यास व सद्याच्या पिकाचा फोटो घेऊन अपलोड केल्यास सबमिट होत नाही. सबमिट झाले का, आपण भरलेली माहिती अचूक आहे का? हे पाहण्यासाठी पर्याय नसल्याने शेतकरी गोंधळात सापडले आहेत.

शेतकरी गोंधळात

ई-पीक पाहणी मोहीम चांगली पण पीकासंदर्भातील माहिती भरणे, स्लोली सर्व्हर चालने, एका पिकाची माहिती अॅपवर अपलोड करण्यास किमान २० मिनिट तरी लागतात. आपण माहिती अचूक की चुकीची भरली हे पाहण्यासाठी ऑपसेन नसल्याने शेतकरी गोंधळात अडकले आहेत. शिवाय तांत्रिक अडचणीचाही सामना करावा लागत असल्याने ई-पीक पहाणी मोहीम शेतकऱ्याची सद्यातरी डोकेदुखी ठरत आहे.

loading image
go to top