Osmanabad : धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड

कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सूरु केली आहे
Osmanabad Income tax department raid Dharashiv sugar factory
Osmanabad Income tax department raid Dharashiv sugar factory

उस्मानाबाद : धाराशिव साखर कारखान्यावर आयकर विभागाची धाड पडली असुन पहाटेपासुन कागदपत्राची पाहणी करण्यात येत आहे. गेल्या काही वर्षात अभिजीत पाटील यानी वेगवेगळे कारखाने विकत घेतल्याने कमी वेळामध्ये त्यांची साखर सम्राटामध्ये गणना होऊ लागली होती. त्यांच्याच कारखान्यावर आता धाड पडल्याने जिल्ह्यामध्ये वेगवेगळ्या चर्चेला उधान आल्याचे दिसुन येत आहे. पंढरपुर विधानसभा निवडणुकीपासुन राजकीय दृष्ट्याही त्यांची शक्ती वाढल्याचे दिसुन आले होते.

धाराशिव कारखान्यावर अगदी पहाटेच आयकर विभागाने धाड टाकली, आल्यानंतर त्यानी सर्व कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सूरु केली आहे. सर्व कर्मचारी व महत्वाच्या अधिकाऱ्यांचे मोबाईलही बंद करण्यात आल्याचे दिसत आहे. अनेक कर्मचाऱ्यांच्या घराचीही चौकशी यावेळी करण्यात आल्याची माहिती आहे. याबाबत जिल्ह्यातील आयकर विभागाला विचारले असता त्याना याबाबत कोणतीही कल्पना नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे ही धाड वरिष्ट विभागाकडुन पडली असण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

या कारखान्याचे अध्यक्ष अभिजीत पाटील हे मुळचे पंढरपुरचे आहेत,सूरुवातीला वाळुच्या व्यवसायामध्ये त्यानी पाय रोवले. त्यानंतर तिथुन त्यानी कारखानदारीमध्ये शिरकाव केला पहिल्यांदा धाराशिव व त्यानंतर अनेक कारखाने त्यानी विकत घेतले आहेत. फार कमी वेळामध्ये त्यांचा राज्यातील मातब्बर साखर कारखानदाराच्या यादीमध्ये समावेश झाला होता. याशिवाय पंढरपुर विधानसभेची पोटनिवडणुक झाली त्यावेळी त्यानी लढण्याची इच्छाही व्यक्त केली होती. नुकताच त्यानी पंढरपुर येथील अत्यंत महत्वाचा मानला जाणारा विठ्ठल कारखान्याची निवडणुक एकतर्फी जिंकुन आपला राजकीय दबदबा वाढविला होता.

या सगळ्यामध्ये त्यांचे राष्ट्रवादी व जेष्ट नेते शरद पवार यांच्याशी अत्यंत चांगले सबंध निर्माण झाल्याचे दिसुन आले होते. मात्र राजकीय दृष्ट्या त्यानी अजुनही कोणत्याही पक्षाचे सदस्यत्व स्विकारलेले नव्हते. सध्या राजकीय विरोधकावर सत्ताधारी विविध यंत्रणेचा गैरवापर करत असल्याचा जाहीर आरोप होत असल्याने या धाडीबद्दलही वेगवेगळ्या प्रकारची चर्चा जिल्ह्यात सूरु झाली आहे. त्यात शिवसेनेचे आमदार कैलास पाटील यांचे अभिजीत पाटील हे भाच्चे असल्यानेही राजकीय तर्कवितर्क लढविले जात आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com